कोल्हे गटाची श्रेयासाठी केविलवाणी धडपड:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छ. श्री.संभाजी महाराज सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे एस्टीमेट तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे ” तांत्रिक मान्यतेसाठी” पाठविले होते.शहरातील हा अत्यंत महत्वाचा व जास्त रहदारीचा रस्ता आहे.खोदकाम करून या रस्त्याचे काम करावे लागणार आहे.साडेतीन कोटी रुपये एस्टीमेट असलेला हा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. साडेचार वर्षे ज्यांना MJP त काहीच दोष दिसला नाही त्यांना मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोष दिसायला लागले आहेत.स्वतःच्या प्रभागात कामे करून घेतांना MJP ची तांत्रिक मान्यता चालली,पण आता शहरातील जास्त रहदारीचे रस्ते झाले तर नगराध्यक्ष व आमदारांना श्रेय मिळेल असा संकुचित विचार होत आहे.
काहीजण सदरचा रस्ता व्हावा म्हणून निवेदनावर जनतेच्या सह्या घेत आहेत,असे समजते.जनतेला असे भासवायचे कि,आमच्यामुळेच रस्ता होत आहे.त्यासाठी सह्यांची मोहिम राबवून केविलवाणे राजकारण सुरू आहे.कोल्हे गटाला खोट्या तक्रारी करायला,आरोप करायला वाव मिळू नये म्हणून या रस्त्याचे MJP ला पाठविलेले एस्टीमेट परत बोलावून घेतले आहे.यानंतर तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी विलंब होणार आहे.त्याला जबाबदार कोल्हे गट व त्यांचे श्रेय वादाचे राजकारण आहे हे सर्व जनतेने लक्षात घ्यावे.बहुमताच्या जोरावर कामे नामंजूर करणाऱ्यांना जनतासुद्धा नामंजूर
करणारच हे संबंधितांनी लक्षात घ्यावे.
विजय वहाडणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *