प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ अध्यक्षा सौ.पूष्पाताई काळे यांच्या हस्ते गौरी सजावट स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२ मध्ये आज कोपरगाव शहरातील शासकीय अधिकाऱ्यांना सपत्नीक देवीची आरती करण्याचा मान देण्यात आला. तसेच यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते गौरी सजावट स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी महिलांनी आजपासून सुरू झालेल्या दांडियाचा आनंद लुटला. जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे.


यावेळी गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, पोलीस निरीक्षक दौलतरावजी जाधव, पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक कृष्णाजी फुलसौंदर, आगार व्यवस्थापक अभिजितजी चौधरी, डॉ. अभिजितजी शहा सर, स्वप्नजाताई वाबळे, सीमाताई पानगव्हाणे, सुचित्राताई घुमरे, रुपालीताई भोकरे, शारदाताई सूरळे आदींसह गौरी सजावट स्पर्धेचे विजेते व सहभागी स्पर्धक व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *