कोपरगाव प्रसिद्ध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हेंचे विश्वासू नारायणशेठ अग्रवाल यांच्याबद्दल वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया SG न्युजच्या माध्यमातून थोडक्यात…

Uncategorized

नारायणशेठ अग्रवाल कोपरगावमधील नावाजलेले व्यक्तिमत्त्व त्यांची प्रमुख ओळख अग्रवाल चहा कंपनीचे नारायणशेठ अग्रवाल तसेच राजकीय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणा, सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध व्यापारी किंवा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळापासुन असलेले कोल्हेंचे विश्वासू अशी त्यांची कोपरगाव व कोपरगावच्या बाहेरील वेगवेगळी नावे.
त्याचे राजकीय संबंध स्थानिक पातळीवर ते नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यापारीहिताचे प्रश्न मांडले व त्या प्रश्नांना न्याय दिला. ते व्यापारी महासंघाच्या माध्यमातून विकासासाठी सक्रिय असतात. नारायणशेठ अग्रवाल कोपरगावमधील प्रमुख व्यापारी प्रतिनीधींपैकी आहेत, जे शहर विकासात आणि व्यापारी संघाचे प्रतिनिधीत्व करतात. आजही ते कोपरगाव शहरातील व्यापारी प्रश्न, घरपट्टी , पाणीपट्टी आणि पाणीपुरवठा यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवतात.हिच त्यांची सामाजिक जाणं ठेवत त्यांचा नुकताच सकाळ च्या वतीने सत्कार सन्मान सोहळा केला त्यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कृषिमंत्री दत्ता भरणे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.
कोपरगाव शहरासह तालुक्यात त्यांचा अग्रवाल चहा कंपनी प्रसिद्ध असुन अनेक कोपरगाकर त्याचा आस्वाद घेतात.
कोरोना काळात त्यांनी अनेक गरजवंतांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. ते यशस्वी उद्योजक, व्यापारी व एक उत्तम लेखक आहे त्यांच्या लेखणीतून ते त्यांचे विचार तरुणपिढी साठी यशाची वाटचाल ठरेल अशा ह्या शांत संयमी हुशार व्यक्तीमत्वाला वाढदिवसाच्या साईमय शुभेच्छा

शुभेच्छुक :- पत्रकार संतोषजी जाधव.
               लेखांकन:- संतोष जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *