कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २ ९ / ०८ / २०२२ रोजी १७.०० ते १८.३० वा चे दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे श्रीगणेश उत्सव अनुशंगाने शांतता समीती सदस्य , श्रीगणेश मंडळ अध्यक्ष , सदस्य प्रतिष्ठीत नागरिक , डि जे . चालक मालक , व पोलीस पाटील यांची मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी , सहाय्यक अभियंता श्री अतुल खंडारे म.रा.वि.वि.कं. तहसिदार प्रतिनिधी नायब तहसिलदार श्री . पी.डी. पवार यांचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली

. सदर बैठकीमध्ये गणेश मंडळांना गणेश उत्सव साजरा करणे बाबत शुभेच्छा देत लोकांना त्रास होणार नाही याबाबत विशेष काळजी घेणे बाबत सुचना दिल्या तसेच पर्यावरण पुर्वक गणेश मुर्तीचा वापर करणे , पर्यावरण पुर्वक सजावट , समाज प्रबोधन या विषयावर विचारावर देखावे , स्वांतत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावे , रक्तदान शिबीर , वैद्यकिय सेवा शिबीर , शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्य , पारंपारिक संस्कृतीक कार्यक्रम , पारंपारिक खेळाच्या स्पर्धा असे कार्यक्रम आयोजीत करणे बाबत तसेच ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी घेवुन शासकिय नियमांचे पालन करुन गणेशउत्सव साजरा करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले . तसेच उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळाना प्रथम , व्दितीय , तृतीय व दोन उत्तेजनार्थ असे पाच बक्षीसे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व नगरपालिका कोपरगाव यांचेकडुन संयुक्तीक देण्यात येणार असले बाबत घोषीत केले आहे . सदरची शांतता कमीटी व गणेश मंडळाची बैठक ही , मा.पोलीस अधिक्षक श्री . मनोज पाटील सो . अहमदनगर , मा . अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम , श्रीरामपुर विभाग , मा . उपविभागीय पोलीस अधीकारी श्री . संजय सातव सो यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव शहर पोस्टे यांनी आयोजीत केली आहे . सदरच्या बैठकीस पोलीस निरीक्षक श्री . वासुदेव देसले , कोपरगाव शहर पोलीस स्टेशन , मुख्याधिकारी श्री शांताराम गोसावी , सहाय्यक अभियंता श्री . अतुल खंडारे म.रा.वि.वि.कं , तहसिदार प्रतिनिधी नायब तहसिलदार श्री . पी . डी . पवार , जिल्हा परिषद सदस्य श्री . राजेश परजणे , फादर प्रमोद बोधक , श्री . नारायण अग्रवाल , प्रा . संतोष पगारे के . जे . एस . कॉलेज कोपगरगाव , अस्लम शेख , बाळासाहेब रुईकर , अनिल गायकवाड , संतोष गंगवाल , भरत मोरे , विजय आढाव , फ्रेंडी जोसेफ फर्नांडीस , बापु काकडे , यांचे सह ६० ते ७० मंडळाचे अध्यक्ष सदस्य , डी जे चालक मालक शांतता समीतीचे सदस्य व महिला दक्षता समीतीचे सदस्या श्रीमती विमल खांबेकर , श्रीमती जोत्स्ना पगारे , सौ . तसनीम आयुब पठान , अडव्होकेट पी . व्ही पाटनी , श्रीमती स्वाती मुळे , डॉ . सौ अर्चना मुरूमकर, पोलीस पाटील , पोलीस अधिकारी व सर्व अंमलदार असे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *