
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात दि.२९ आँगस्ट २०२२ रोजी व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी शिवसेनेचा भव्य मेळावा संपन्न झाला असुन शिवसैनिकांनी या मेळाव्यास मोठा प्रतिसाद दिला असुन या मेळाव्यात कोपरगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदनिशी लढविणार असल्याचे या मेळाव्यात सुतोवाच केले आहे. सदरचा कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले.या मेळाव्यास माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मार्गदर्शन केले आहे.या मेळाव्यात शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,येणाऱ्या निवडणुका शिवसेना लढविणार असुन जर कोपरगाव नगरपरिषदेला खुल्या प्रवर्गातुन नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यास शिवसेने तर्फे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून राजेंद्र झावरे निवडणूक लढवतील असे जाहिर केले आहे.तसेच पक्षाचे संपर्क प्रमुख ज्या प्रमाणे निर्णय घेतील त्या पद्धतीने कामकाज करु पुढे शिवसेना नेते नितिन औताडे म्हणाले की मी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत आलो. मराठी माणसासाठी लढणारा शिवसेना एकमेव पक्ष आहे.येणाऱ्या सर्व निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुठ होवुन काम करावे आणि शिवसेनेचा भगवा झेंडा या तालुक्यात फडकवावा.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संपर्क प्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की,शिवसेना पक्ष गोर गरिबांचा पक्ष आहे.अनेक सामान्य माणसाला आमदार खासदार या पक्षाने केले केले आहे.पुढे ते म्हणाले की,सुरूवातीला मी निवडणूक लढविली त्यावेळी मला ३७५० मते मिळाली त्यानंतर साहेबांनी सर्व पराभूत उमेदवारांना बोलावले, त्यात मीही होतो. साहेब मला म्हणाले की,तुम्हाला ३७५०. मते मिळाली त्या मतदारासांठी तुम्हाला काम करायचे आहे.मी त्यांच्यासाठी काम केले आंदोलने केली, पुढच्या निवडणुकीत १९९० साली ७८००० मतांनी मि निवडुण आलो.अशा निष्ठावान पक्षामुळे मी आमदार झालो.या पक्षात मी दादा भुसे, राठोड, विखे असे अनेकांना पक्षात मी आणले. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुक हि कार्यकत्याची निवडणूक आहे.त्यामुळे जोमाने काम करा.मी पण आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.नगर जिल्ह्यासह कोपरगाववर भगवा फडकला पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले आहे.जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे या प्रसंगी म्हणाले की,जिल्हा परिषद,ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका शिवसेने मार्फत पूर्ण ताकदीने लढवायच्या आहे.या निवडणुकीत भगवा डौलाने फडकवयाचा आहे.यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. शिवसेनेला कोपरगाव मतदार संघात मानणारा मोठा वर्ग आहे.या निवडणुकीत शिवसेनेचा विजयी रथ खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. तसेच या मेळाव्यात नवनियुक्त महिला आघाडी जिल्हा संघटक सपना मोरे,ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व शहर उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव हे अनुपस्थित होते. कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप,योगेश घोलप,नितिन औताडे,उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,जि.प.सदस्य बाळासाहेब राहणे,नगरसेविका वर्षा शिंगाडे,अक्षीता आमले,श्रीरंग चांदगुडे,रावसाहेब थोरात,श्रीक्रांत चव्हाण,इरफान शेख,प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,योगेश उशीर, बाळासाहेब सांळुके,राहुल देशपांडे,वसिम शेख,विशाल झावरे,विक्रांत झावरे,अभिजित जाधव,जाफर पठाण,प्रवीण शेलार,निशांत झावरे, मयूर दळवी,राकेश वाघ,अशोक पवार,दिलिपराव आरगडे,कुक्कु साहानी,दिलीप सोनवणे,किरण खर्डे,अश्विनी होणे,शितल चव्हाण,छाया बागुल,राहुल देशंपाडे,सतिष शिंगाणे,योगेश उशिर,जाफर शेख,बाबासाहेब बढे,बाळासाहेब मापारी,किरण कुऱ्हे, अविनाश धोक्रट,मंगेश देशमुख,मनोज ताठे, संतोष भालेराव, सनी खंदारे,आकाश कर्डिले,निखिल मढवई,अक्षय नन्नवरे,दीपक बरदे,रवि पवार,संतोष झावरे,अजय दिवटे,निखिल दिवटे, संजय बाविस्कर,अंबादास वाघ,मधुकर पवार,किरण अडांगळे,वेदांत कर्पे, कलीम शेख,सुमित बोर्डे, अनुप गिरमे, सचिन मोरे, किरण सूर्यवंशी, सतीश खर्डे, अरुण बोराडे,अभिषेक आव्हाड अमोल पहिलवान,प्रवीण शिंदे,पिंटू बोर्डे, शेखर ठोंबरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी मानले आणि हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
