संजीवनी सैनिकी स्कूलचा २२ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
कोपरगांव प्रतिनिधी:-
माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी २२ वर्षांपूर्वी ग्रामिण मुलांना सैनिकी शिक्षण मिळावे, त्यांच्या प्रती देश भक्तीची भावना वाढीस लागवी, सैनिकी अधिकारी बनावे, जर सैनिकी अधिकारी नाहीच होता आले तरी कोठेही आपले प्रामाणिक काम करून देशाची सेवा करावी, या हेतुने सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजची स्थापना केली. त्यांच्या विचारधारेची काटेकोर अंमलबजावणी करून येथुन देशाचे आदर्श नागरीक घडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सिश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या २२ व्या स्थापना दिन स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री कोल्हे बोलत होते. यावेळी संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालय व हाॅस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सचिव श्री ए. डी. अंत्रे, स्कूल डायरेक्टर श्री डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. जी.बी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. कैलास दरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी होती. सुुरूवातीस सरस्वतीची मुर्ती व कै. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
श्री सुमित कोल्हे यांनी पुढे म्हटले की मागील २२ वर्षांपासून चागल्या शिक्षकांची टीम येथे कार्यरत असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले विध्यार्थी येथे घडले आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या स्पर्धा बघता एनडीए, जेईई, एनईईटी अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले जातील.
डाॅ. पवार म्हणाले की येथे शिक्षण घेत असलेले विध्यार्थी भाग्यवान आहेत. ते म्हणाले की आपले कार्यकर्तृत्व एवढे खुलवा की त्यासाठी मिळालेली शिस्त व ज्ञान हे संजीवनी मधुन मिळाले असे अधोरेखित झाले पाहीजे. श्री ए. डी. अंत्रे म्हणाले की विध्यार्थ्यांचे करीअर घडविण्यासाठी संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांमध्ये भरपुर संधी आहेत. श्री डी. एन. सांगळे म्हणाले की येथे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत येथिल सर्व शिक्षक विध्यार्थ्यांकडून अभ्यासासहित विविध उपक्रम करून घेतात, त्याचे कारण म्हणजे ज्या विश्वासाने पालकांनी त्यांच्या पाल्यास येथे दाखल केले, तो विश्वास सार्थ ठरून प्रत्येक विध्यार्थी यशस्वी झाला पाहीजे. डाॅ. गायकवाड यांनी मागील २२ वर्षातील वर्षातील स्कूलचा चढत्या कमानीचा आलेख सांगीतला. ते म्हणले की प्रत्येक जिल्ह्यालाला फक्त एकच सैनिकी स्कूल असते, परंतु माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांच्या आग्रहास्तव सरकारला अहमदनगर जिल्ह्यात दुसरे सैनिकी स्कूल मंजुर करावे लागले. उपप्राचार्य कैलास दरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपले मनोगते व्यक्त करून त्यांच्या जडणघडणीत स्कूलची कशी मदत होत आहे हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन शिक्षक श्री आण्णासाहेब थोरात यांनी केले तर श्री नाना वाघ यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात स्कूलच्या स्थापना दिना निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

फोटो ओळीः संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कालेजच्या २२ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे.
