लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अनोख्या पद्धतीने जयंती साजरी..!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीमत्व, थोर समाज सुधारक, उपेक्षित वंचित कष्टकऱ्यांचा आवाज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त देवळाली प्रवरा मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने येथील एकल भगिनी अमिषा सुलेमान सय्यद यांना जवळपास १० हजार रुपये किमतीची हातगाडी भेट देऊन भाजीपाला व्यवसाय उभारणीस मदत करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली..
प्रसंगी प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, सचिव प्रशांत कराळे, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, संघटक सुनील कदम, प्रभाकर कांबळे, शाखा अध्यक्ष अमोल साळवे, प्रहार च्या राहुरी फॅक्टरी महिला शहर अधक्ष्या रजनीताई कांबळे, उपाध्यक्ष वंदना कांबळे, अफसाना सय्यद, नंदू उल्हारे, विशाल बर्डे, अमिषा सय्यद, पूजा राजेंद्र शिंदे, अफसाना सय्यद, आमिना सय्यद, कविता पवार, जनाबाई उदावंत, जुलेखा शेख आदी उपस्थित होते.
अंबिकानगर येथील दानशूर व्यक्तिमत्त्व रतन बाबूलाल पठाण यांनी वरील गाडी देणेसाठी मोठे योगदान दिले असल्याचे प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, यापूर्वी कोरोनाने एकल झालेल्या देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व कोरोना एकल महिलांना यापूर्वी दिवाळी भाऊबीज निमित्त साई आदर्श मल्टिस्टेट च्या मदतीने साडी आणि फराळ वाटप करून संघटनेने अनोखी भाऊबीज साजरी केली आहे, तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील पाचवी पर्यंतच्या नऊ एकल मुलींना परिसरातील दानशूर मंडळींच्या सहकार्यांने प्रत्येकी दहा हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वाटपही नुकतेच संघटनेच्या माध्यमातून करणेत आले असून मा. ना. बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिन आम्ही एकल मुलांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला आहे. आत्तापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जवळपास ६०० बालकांना शासनाची बाल संगोपन योजना लागू करणेसाठी हातभार लावला असून या योजनेतील ११०० रुपये प्रतिमाह आर्थिक मदत २५०० रुपये करणेसाठी संघटना प्रयत्नशील असल्याचेही ढुस यांनी यावेळी सांगितले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ज्या पद्धतीने आज परिसरातील एकल भगिणीला भाजीपाला व्यवसाय करणेसाठी हातगाडी देऊन तिचा व्यवसाय सुरू करून दिला त्याच पद्धतीने अश्या गरजू एकल महिलांसाठी लवकरच एक उद्योग उभारून त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ढुस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *