“सप्ताहात येणाऱ्या भाविकांना प्रसादा बरोबर रोपटे भेट द्यावे”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
पावसाळा सुरू झाल्यावर वनीकरण विभाग व शासना कडून वृक्ष लागवडीचा संकल्प केला जातो मात्र गंगागिर महाराज यांच्या १७५ व्या सप्ताह निमित्ताने सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रसादा बरोबर वनीकरण विभागाने एक रोपटे भेट द्यावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की,येत्या दोन तारखेपासून कोकमठाण येथे सद्गुरू गंगागिर महाराज यांच्या १७५ व्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात नगर नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील लाखो भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात या सप्ताहात आमटी भाकरीचा प्रसाद दिला जातो
या सप्ताहात मोठ्या धार्मिक भावनेने सहभागी होणारे भाविक हे शेतकरी कुटुंबातून आलेले असतात अत्यंत शिस्तबद्ध रित्या सर्व भाविक प्रसाद घेतात
या वेळच्या सप्ताहाचे वैशिष्ठ म्हणजे या सप्ताहात येणाऱ्या भाविकांसाठी कृषी औजारांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे
शासन व वनीकरण विभाग दर वर्षी पावसाळा सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षरोपन करते मात्र हे वृक्षारोपण प्रत्यक्षात येण्याऐवजी कागदावरच होत असते मात्र या वृक्षरोपन मोहिमेला धार्मिकतेची जोड दिल्यास मोठ्या प्रमाणावर उद्दिष्ट्य सद्या होऊ शकते त्यामुळे या सप्ताहात सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रसादाबरोबर वन विभागाने एक रोपटे भेट दिल्यास या सप्ताहाची आठवण म्हणून शेतकरी या झाडाचे चांगले संगोपन करतील या सप्ताहाला रोज लाखो भाविक भेट देतात या तिन्ही जिल्ह्यातील वन विभागाने नियोजन करून भाविकांना रोपटे भेट दिल्यास खूप मोठे उद्दिष्ट्य साध्य होईल त्याच प्रमाणे येणाऱ्या भाविकांच्या धार्मिकतेला वृक्षारोपण करण्याचे आवाहन करून एक रोपटे भेट द्यावे असे आवाहन या पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *