कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष पदाची नवनियुक्ती जाहीर:- तुषार पोटे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- संपूर्ण महाराष्ट्रात शिर्डी येथील नवसंकल्प शिबीर पार पडल्यानंतर ग्रामीण व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्त्या सुरु असून नगर जिल्ह्यात सर्व तालुक्यात तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडी पार पडत आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,आ.सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्याच्या निवडी जाहीर केल्याचे वृत्त युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी दिले.याप्रमाणे कोपरगाव तालुकाध्यक्षपदी आकाश संजय नागरे,कोपरगाव शहराध्यक्षपदी तुषार पोटे ,जिल्हा सरचिटणीस पदी नितीनराव शिंदे,सुनिलजी साळुंके,राजूभाई पठाण यांच्या निवडीची माहिती पोटे यांनी दिली.आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी लक्षात घेता सदर निवडी महत्वाच्या असून पुढील 100 दिवसाचे प्लॅनिंग त्यात काँग्रेस पक्षाचे ग्रामीण व शहरी भागात विस्तारीकरण,बूथ मॅनेजमेंट,पदाधिकारी पुनररचना,निवडणूक तयारी इत्यादी पक्षीय धोरणे नूतन पदाधिकाऱ्यांना ना.थोरात व श्री.पटोले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व नूतन पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुका व शहरात यशस्वी अंमलबजावानी होईल असे पोटे यांनी सांगितले.युवक काँग्रेस,महिला काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस,सेवादल तसेच सर्व फ्रंटल मध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणाऱ्या नागरिकांनी सम्पर्क करावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *