
कोपरगांव प्रतिनिधी:-
राज्याच्या रयत शिक्षण संस्थेचे आधारवड, शुन्यातुन विश्व निर्माण करणारे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी दहावी इयत्तेत (1945) शिक्षण घेत असल्यापासून पुस्तक वाचनाचा छंद जोपासला. पूस्तक व्यासंगातुन स्वतः बरोबर दुस-याला घडविणारे व्यक्तीमत्व हरपले अशा शब्दात अर्थशास्त्राच्या माजी प्राध्यापिका डॉ. मुक्ता, व विवेक पुरंदरे यांनी श्रध्दाजली वाहिली.
रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगांव येथील सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे १९७३ पासुन अध्ययन करणा-या डॉ. मुक्ता पुरंदरे यांच्या पाचवड येथील सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांनी स्वत: हजेरी लावली होती. विकसीत व विकसनशील देशातील अर्थनिती आणि त्यानुरूप असणारी धोरणे याबाबत शंकरराव कोल्हे यांनी तत्कालीन प्राध्यापक शामराव तोडकर व प्रा. डॉ. मुक्ता पुरंदरे यांच्याकडुन सातत्याने माहिती घेतली होती. वयाच्या ९३ वर्षापर्यंत शंकरराव कोल्हे यांनी वाचनाचा ध्यास कधी सोडला नाही.
श्री. विवेक पुरंदरे यांनी शंकरराव कोल्हे यांच्या आठवणी जागवितांना सांगितले की, पुर्वी आभासी तंत्रज्ञान प्रगत नसतानाही शंकरराव कोल्हे यांचा वाचनसंग्रह अफाट होता. बाजारात जे जे नविन पुस्तक यायचे ते ते त्यांच्या प्रवासी वाहनात असायचे. त्यांनी दया पवारांचे बालूत व दलित साहित्य वाचले, त्यांच्या पुस्तक संग्रहात ओशो, अरूण शौरी यांचे वर्कशीपींग फेल्स गॉड, रामचंद्र गुहांचे इंडिया अफटर गांधी व इंडिया अफटर नेहरू, अशी एकाचढ एक विचारवंत, नामवंत लेखकांची पुस्तके होती. तुकाराम गाथेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या निधनाने परखड व्यक्तीमत्व, पुस्तक विचारवंतास आपण मुकलो आहोत. पुणे प्रवासात ते नेहमी कोपरगावच्या छगन मगन पैलवानांची अहमदनगरच्या प्रसिध्द मुंबई बासुंदी दुकानाची गोष्ट सांगत.
