साईगाव पालखी सोहळ्याच्या पोस्टरचे प्रकाशन गुढीपाडवाच्या मुर्हतावर २ एप्रिल पासुन कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर बालाजी कथा प.पू. साध्वी अनुराधा दिदी यांचे सुमधूर आवाजात होणार सुरुवात…!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांचे वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा २ एप्रिल पासुन कोपरगाव शहरातील तहसील मैदानावर बालाजी कथा प.पू. साध्वी अनुराधा दिदी यांचे सुमधूर आवाजात २एप्रिल पासुन सुरुवात होणार आहे. त्यापोस्टर चे प्रकाशन तहसीलदार बोरुडे साहेब,कोपरगाव पोलिस स्टेशन पी.आय.श्री. वासुदेव देसले साहेब,कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी श्री. शांताराम गोसावी साहेब यांचे हस्ते प्रकाशित केले आहे.या प्रसंगी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले म्हणाले की,सर्व धर्माच्या देवी देवतांचे पुजनाने मन प्रसन्न राहते.मन प्रसन्न आणि शांत राहिल्यास माणासाच्या हातून सत्कर्म घडते.सत्कर्मातुन समाज घडतो.समाज घडल्यास देशाचीही प्रगती होते. या प्रसंगी साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांचे वतीने सुनील फंड अध्यक्ष मुंबादेवी तरुण मंडळ, कोपरगाव साईगाव पालखी सोहळा चे संतोष चव्हाण, नगरसेवक संजय
जगताप, अनिल गायकवाड, संदिप दळवी, अरविंद मंडलिक, राहुल देवळालीकर, अॅड नितीन पोळ, अकबरभाई शेख, निसारभाई शेख ,अरुण विघे आदी मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *