

कोपरगांव प्रतिनिधी:- सातत्याने विकासाचे धोरण डोळयासमोर ठेवुन कोपरगांव शहरातील सर्व विकास कामांना गेल्या 4 वर्षापासुन झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमतांनी मंजुरी दिलेली आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही कायमच सकारात्मक भुमिका ठेवलेली आहे. ज्यावेळी नगराध्यक्षांनी व मुख्यधिका-यांनी आम्ही सांगितले ते विषय शहरासाठी महत्वाचे आहे त्या त्या वेळी आम्ही ते विषय बहु मताने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवुन मंजुर करुन दिले त्याचबरोबर मागील 4 वर्षात कोपरगांव नगर पालिकेच्या नियमानुसार 36 सर्व साधारण सभा होणे आवश्यक होते, त्याऐवजी नगराध्यक्षांच्या मनमानी व हेकेखोर स्वभावामुळे फक्त 13 सर्व साधारण सभा झाल्या. कोपरगांव नगरपरिषदेने दिनांक 10 नोव्हेंबर रोजी एकुण 28 कामांच्या निवीदा प्रसिध्द केल्या होत्या. त्या पैकी काही निविंदाची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2020 व काही निविदांची 5 डिसेंबर होती वरील सर्व निविदा साधारण 10 ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत मंजुर झाल्या पाहिजे होत्या व त्याच वेळी स्थायी समितीची सभा घेतली पाहिजे होती, परंतु तसे न करता नगराध्यक्षांनी व नगरपालिकेला सोयीची असणारी फक्त 12 कामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली, राहिलेली 16 कामे मिटींग समोर का आली नाही ? उर्वरित 16 कामे ज्या प्रभागातील आहे, तेथील जनतेशी दुजाभाव कशासाठी असे आम्ही विचारले असता नगरध्यक्षांनी व प्रशासनांनी आम्हांला उत्तर दिले नाही. ही सर्व कामे नगरपालिका फंड, 14 व्या वित अयोग आणि रस्ता अनुदान या फंडातुन होणार आहे. याकामांसाठी विद्यमान आमदरांनी निधी आणला अशा खोटया बातम्या काळे गटाचे नगरसेवक देत आहे, आमदारांचा या निधीशी कवडीचा ही संबंध नाही. आम्ही जनहिताच्या दृष्टीकोनातुन विरोध केला. हे सर्व माहित असुन सुध्दा जनतेची दिशा भुल करण्यासाठी नगराध्यक्षांनी व विरोधकांनी आमच्यावर खोटे आरोप केले की, आम्ही कोणतेही कारण न देता विषय नामंजुर केले हे दुर्देवी आहे. या कारभारामध्ये नगराध्यक्ष व सहमी एक्सप्रेस यांचे संगनमत स्पष्टपणे दिसुन येत असल्याने खरी वस्तुस्थिती काय आहे हे जनतेपुढे आणण्यासाठी भाजप शिवसेना आर.पी.आय. मित्र पक्ष नगरसेवकांनी सहमती एक्सप्रेस मालामाल… नगरपालिका कंगाल चे वस्तुस्थितीचे पत्रक शहरात वाटप करण्यात आले.

दिलेल्या पत्रकात म्हणटले आहे की, रस्त्याच्या सर्व कामांसाठीची तांत्रिक मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडुन घेणे गरजेचे होते, तसे न करता नगरपालिकेने त्यांच्या सोयीसाठी जाणुन बुजुन वरील निविदामधील रस्त्यांच्या सर्व कामांची तांत्रिक मंजुरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांचेकडुन घेतली. वास्तविक पाहता ही मंजुरी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडुन का घेतली नाही ? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्या अंतर्गत फक्त पाणी पुरवठा योजनेची काम बघितली जातात तेा विभाग रस्त्यांची कामे बघत नाही. ज्या 28 कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या होत्या ती सर्वच्या सर्व कामे स्थायी समितीत चर्चेकरिता घ्यावीत व सदरची सभा इनकॅमेरा घेण्यात यावी परंतु नगराध्यक्ष तसे काहीही न करता जी 12 कामे यांनी घरात बसुन वाटप केली होती व त्यांच्याच निर्देशाप्रमाणे तयार केलेल्या अंदाजपत्रकीय दराने होती व त्यांच्याच सहमतीच्या ठेकेदाराला मिळणार होती तिच कामे त्यांनी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी करीता ठेवली. त्यास आम्ही जनहिताच्या दृष्टीकोनातुन विरोध केला. हे सर्व माहित असुन सुध्दा जनतेची दिशा भुल करण्यासाठी नगराध्यक्षांनी व विरोधकांनी आमच्यावर खोटे आरोप केले की, आम्ही कोणतेही कारण न देता विषय नामंजुर केले हे दुर्देवी आहे. या कारभारामध्ये नगराध्यक्ष व सहमी एक्सप्रेस यांचे संगनमत स्पष्टपणे दिसुन येते.
निविदेतील रस्त्यांच्या कामामध्ये आर्किटेक्चर व सुपरव्हिजन फी च्या नावाखाली 40 ते 50 लाख रुपयांचा समावेश आहे. सदरचे काय हे बांधकाम इमारतीचे नसुन रस्त्याचे आहे. सदरचे इस्टीमेट बनविणे व सुरपव्हीजन करणे हे नगरपालिकेच्या बांधकाम विभागचे काम असतांना दुस-या एजन्सीला कामाचा मोबादला म्हणुन 40 ते 50 लाखांची उधळपटी करण्याचे काय ? अशी विचारणा करुन पुढे म्हणाले आहे की, रस्त्यांची सर्व कामे नगराध्यक्ष , मुख्यधिकारी आणि बांधकाम अभियंता यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडुन फेर अंदाजपत्रक बनवुन व तांत्रिक मंजुरी घेवुन नविन निविदा प्रसिध्द कराव्या या सर्व नविनप फेरनिविदांना मंजुरी देण्यास आम्ही तयार आहोत, तो वाचलेला पैसा शहरातील इतर गरज असलेल्या महत्वाच्या रस्त्यासाठी खर्च करावा आपण शहरातील नियमित कर भरणारे सुज्ञ नागरिक आहात, म्हणुन आपल्या पैश्याची उधळपटटी होतांना पाहायची का ? याचा निर्णय जनेतेने घ्यायचा आहे.

नगराध्यक्ष व त्यांच्या सहमती एक्सप्रेसच्या लोकांना जनतेचे कष्टाचे पैसे वाचविण्याची व उधळपटटी थांबविण्याची प्रभु सदबुध्दी देवो अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय. व मित्र पक्षाचे नगरसेवकांनी पत्रकाव्दारे केली आहे.
