
कोपरगांव प्रतिनिधी:- राज्यात १८१ साखर कारखाने असुन त्यापैकी फक्त २५ साखर कारखाने सुस्थीतीत आहे अन्य कारखान्यांची स्थिती हलाखीची आहे, दिवसेंदिवस साखर साठवणुकीचा प्रति पोते खर्च वाढत आहे, व्याजाचे बोजे वाढत आहे, बाझीलमध्ये १७ टक्के साखर उतारा मिळतो. त्यामुळे तेथे साखर उद्योगातील खर्चाचा ताळमेळ बसतो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याने सुद्धा जादा साखर उतारा देणाऱ्या ८६०३२ तसेच ११०१५ आदी उसाचीच लागवड करावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने कमी मनुष्यबळात साखर कारखाने चालविण्याचे तंत्र अवगत झाल्याने त्याचाही येथील कारखानदारीने विचार करावा, उपपदार्थ, औषध, बायोगॅस निर्मितीवर भर द्यावा तरच भविष्यात हा उद्योग तग धऊ शकेल अन्यथा परिस्थीती अवघड होऊन ग्रामीण अर्थकारण धोक्यात येईल अशी भिती साखर उद्योगातील तज्ञ व माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी व्यक्त केली.
सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांची बॉयलर पुजा शुक्रवारी झाली त्याप्रसंगी सभासद् शेतक-यांसमोर ते बोलत होते. आम्ही खाजगीशी दोन हात केले पण आता पुन्हा खाजगीचेच आव्हान सहकारी साखर कारखानदारी समोर उभे राहिले आहे. सभासद, कामगार, व्यवस्थापन, त्यावर अवलंबुन असणाऱ्या घटकांचा विचार करत आम्ही सहकारी साखर कारखानदारी चालविली पण आता डिझेलच्या किंमती वाढल्या आहे त्यामुळे दुष्काळात तसेच उसाची उपलब्धता कमी असतांना दुरवरून उस आणुन गळीत हंगाम यशस्वी करण आता परिस्थीती अवघड आहे.
कारखान्यांत तयार झालेले साखर पोते १८० दिवस सांभाळायचे म्हटले तर प्रती पोत्यावर ३६० रुपयांचा व्याजाचा भुर्दंड साखर कारखानदारांना सोसाव लागतो. एफआरपी तुकडे करून देता येत नाही. सभासद् शेतकऱ्यांना उस गळीताचे पैसे तात्काळ द्यावेच लागतात. आपल्याकडे एका कारखान्यांत १००० ते १५०० कामगार काम करतात तर परदेशात कमी कामगारात साखर उद्योग चालविला जातो.
ब्राझीलमध्ये चालुवर्षी दुष्काळ आहे त्यामुळे तेथे साखरेचे उत्पादन कमी होईल. भारतीय बाजार सहकारी साखर कारखान्यांना ही संधी चालून आली आहे. सहकाराने ग्रामीण भागातील विकासाचा चेहरा बदलला आहे; पण सहकाराला आता खाजगीचे धक्के बसु लागले आहे. पर्जन्यमान बरे असल्याने ३-४वर्ष साखर उद्योग टिकून आहे. उपपदार्थ निर्मिति करून सहकारने भारताच्या आत्मनिर्भर अभियानाला बळ द्यावे तरच हा उद्योग टीकुन राहिल. केंद्र शासन मदत करतो, राज्य शासन मदत करत नाही, ही पस्थितीती बदली जावी.
चौकट:- ब्राझीलमध्ये उत्पादनानुरूप धोरण ठरविले जाते, त्याचप्रमाणे आपल्याकडे साखर व इथेनॉल उत्पादनांत साखर कारखानदारिची धोरणे तात्काळ घेऊन हा उद्योग व त्यावर अवलंबून असणारी व्यवस्था टिकवावी असे शंकरराव कोल्हे म्हणाले.
