नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची कोव्हीड रुग्णांना भेटुन दिलासा देण्याचा प्रयत्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोनाच्या रुग्णांना भेटून दिलासा देण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे हे नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्ण आणि रुग्णांचे कुटुंबिय यांची भेट घेत आहेत.हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर रेमडिसिव्हीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा फारच तुटवडा असल्याचे जाणवते. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे सर्व उपलब्धतेसाठी वरिष्ठ शासकिय अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.

Read More

शासनाने अडचणीत सापडलेल्या संघांकडून पूर्ण क्षमतेने दूध खरेदी करावे:- राजेश परजणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरु असल्याने दुग्ध व्यवसाय सद्या मोठ्या संकटात सापडला असून शासन पूर्ण क्षमतेने दूध स्वीकारीत नसल्याने दुधावर प्रक्रिया करणारे दृध संघ व प्रकल्पांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही गंभिर परिस्थिती विचारात घेऊन शासनाने १०० टक्के दूध खरेदी करावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष […]

Read More

राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा; आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आला आहे मात्र हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत न झाल्यामुळे सदर महामार्गाचे काम करण्यास अडचणी येत होत्या. सदर कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने […]

Read More

पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त नाकाबंदी दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांची धडक कार्यवाही….

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हयाचे मा पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील साहेब , मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर दिपाली काळे मॅडम , मा उपविभागिय पोलीस अधिकारी शिडी श्री.संजय सातब साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार जिल्हयातील मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना आळा घालण्यासाठी पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे.तसेच मा जिल्हाधीकारी साहेब अनगर यांचेकडील कोरोना प्रतीबंध […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम..!

पाचव्या सत्रात प्रज्वल काकडे ९९. २२ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम… कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईने कोविड-१९ च्या वैश्विक महामारीमुळे मार्च, 2021 मध्ये घेतलेल्या हिवाळी परीक्षा २०२० च्या विषम सत्रांचे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन यात संजीवनी पाॅलीटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात अंतिम वर्षाच्या पाचव्या सत्रात काॅम्प्युटर विभागातील प्रज्वल बाबासाहेब […]

Read More

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज:- श्री. विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संपुर्ण विश्वाला ज्या महामारीने व्यापले आहे, प्रगतशील देशातील जीवन ज्या मुळे कोडमडले आहे, त्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. या परिस्थितीमध्ये प्रशासन काम करत आहे. परंतु या वैश्विक महामारीचा मुकाबला करण्याचे हे काम केवळ एकटया प्रशासनाचे नाही, अनेक अडचणींवर मात करत प्रशासन काम करत आहे, कोपरगाव तालुक्यावर आलेले हे संकट निश्चितचभयावह आहे, […]

Read More

राहुरीचे डॉ.अण्णासाहेब गागरे यांचे अल्पश्या आजाराने निधन…

कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-राहुरीचे डॉ अण्णासाहेब गागरे यांचे आज दि. १९ एप्रिल रोजी पहाटे अल्पश्या आजाराने अहमदनगर येथील मॅक्स केअर रुग्णालयात निधन झाले.अत्यंत साधी राहणी, मनमिळावू स्वभाव आणि राहुरी येथील डॉ गागरे हॉस्पिटल चे माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला पैसे नसले तरी तात्काळ वैद्यकीय मदत करण्यासाठी ते राहुरी परिसरात सर्वांना सुपरिचित होते, तसेच त्यांनी अत्यंत आर्थिक हालाकीच्या […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१९ एप्रिल रोजी १३६ कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १८१ आहेत व मयत २ जण आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ एप्रिल २०२१ आज १८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ९५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २२ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १९ रुग्णांचे अहवाल. शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:- शहरी पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ६खडकी – ६निवारा – ५दत्त नगर – ३हनुमान नगर – ३स्टेशन […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१८ एप्रिल रोजी १०० कोरोना पॉझिटिव्ह तर डिस्चार्ज दिलेले १६२ आहेत व मयत ३ जण आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ एप्रिल २०२१ आज १६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३१७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०७ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवाल. शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:- शहरी अहवाल पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – ५कापड बाजार – २साईसिटी – २मोहिनीराज नगर – २गुलमोहर कॉलनी […]

Read More

अध्यादेशानुसार १ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ७:०० ते ११:०० च्या दरम्यान सुरू राहतील:- डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हाधिकारी यांनी नुकताच काढलेला नव्याने अध्यादेश लागू करण्यात येत आहे. या अध्यादेशानुसार १ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ७:०० ते ११:०० च्या दरम्यान सुरू राहतील. ११ नंतर वेळेस सर्व दुकाने, कार्यालय, भाजीपाला बाजार बंद राहतील. 🟦हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालू राहील 🟦धार्मिक स्थळे पुर्णतः […]

Read More