कोपरगावात वाढत्या अवैध धंद्याकडे आ.आशुतोष काळेंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीसांचे वेधले लक्ष…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर -कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात वाढलेल्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे लक्ष वेधून अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांना सविस्तर निवेदन दिले आहे. कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले […]

Read More

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूल विजेता , गौतमच्या चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या हॉकी संघात निवड…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ते ७ रोजी गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ या स्पर्धेचा विजेता संघ ठरला असून गौतम पब्लिक स्कूलच्या प्रणव लोंढे (गोलकीपर), […]

Read More

के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“”महाराष्ट्राच्या राजकीय चारित्र्याचा, नैतिकतेचा व मूल्यांचा इतिहास जर कुणाला लिहावासा वाटला तर त्या पुस्तकातील खूप जागा के.बी. रोहमारेंचे व्यक्तिमत्व घेईल. आजच्या राजकारणातील नागवेपण संपवायचे असेल तर केबीं सारख्या तत्त्वनिष्ठ राजकारण्यांची गरज आहे. के.बी. साहेबांनी कृष्णाकाठा प्रमाणे गोदाकाठी क्रांती आणली. नगर जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि गोदामाई प्रतिष्ठानचे गोदावरी स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न…

निवडणूक निकालापूर्वीच विश्वासनामा सत्यात उतरविण्याचे पहिले पाऊल :- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-रविवारी सकाळी गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी युवानेते विवेकभैय्या कोल्हे,गोदावरी नदी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे,भाजपा मित्रपक्षांचे उमेदवार पराग संधान व विविध प्रभागातील उमेदवार यासह मोठ्या संख्येने युवासेवक आणि गोदासेवक उपस्थित होते. कोपरगाव शहर आणि तालुक्याला […]

Read More

महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे लोकशाही व न्यायाचा अधिकार मिळाला :- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्ञानाचे महासूर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगावात अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कार्यकर्त्यांसह वंदन करून महामानवांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले. वंदनीय महामानव डॉ.बाबासाहेब […]

Read More

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा या तत्वानुसार शिक्षण, स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला असून सर्वांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. त्यांनी मानवमूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडविण्याचा जो ध्यास घेतला, तो आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. संविधान रचतांना त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना देशाच्या केंद्रस्थानी ठेवले. […]

Read More

कर्मवीर काळे कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी कामगारांसाठी ‘उन्नती शिबीर’ संपन्न..

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ च्या गाळप हंगामात उसतोडणी करण्यासाठी आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांची ‘उन्नती शिबीर’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक गोळ्या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. बोरनारे यांनी दिली आहे.ऊस तोडणी […]

Read More

राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजनातून कर्मवीर शंकररावजी काळेंचे स्वप्न साकार, राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धाचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते दिमाखात उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच हॉकी,फुटबॉल, जिमनॅस्टीक, मल्लखांब अशा अनेक खेळाच्या उत्तम प्रशिक्षणातून गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून दाखवत राज्य स्तरावर गौतम पब्लिक स्कूलच्या नावाचा दबदबा तयार केला आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आणि सर्व क्रीडा प्रकारासाठी उपलब्ध […]

Read More

पांडुरंग पाटील, डॉ. हंसराज जाधव, सचिन शिंदे, सागर जाधव जोपुळकर, डॉ. नारायण शिवशेट्टे, भारत सातपुते यांना भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर..

कोपरगाव प्रतिनिधी:-पोहेगाव ता. कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये पांडुरंग पाटील (राधानगरी, कोल्हापूर), डॉ. हंसराज जाधव(पैठण), सचिन शिंदे(उमरखेड,यवतमाळ), सागर जाधव जोपुळकर,(चांदवड, नाशिक), डॉ. नारायण शिवशेट्टे (अर्जापूर,नांदेड), भारत सातपुते (गातेगाव, लातूर) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष […]

Read More

आरमान पठाणच्या महाराष्ट्राच्या शालेय क्रिकेट संघात निवडीने कोपरगाव तालुका क्रिकेट चे भविष्य उज्वल…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवुनमहाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय,पुणे (महाराष्ट्र शासन) यांनी जाहीर केलेल्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात अरमान पठाणची निवड झाली.त्या बदल नुकत्याच कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन च्या वतीने आरमान चा सत्कार करुन त्याला शुभेच्छा देण्यातआल्या.या वेळी असोसिएशन चे सचिव मनोज कपोते यांनी आरमानच्या निवडीचे कौतुक केले व […]

Read More