नाभिक एकता महासंघ मराठवाडा महिला अध्यक्षा उज्वलाताई गुरसुडकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाभिक एकता महासंघ. मराठवाडा महिला अध्यक्षा सन्माननीय सौ उज्वलाताई गुरसुडकर यांना उत्कृष्ट पत्रकारीता आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भेंडेगाव येथील ग्रामीण उद्देश न्यूज पेपर श्री गणेश मंडळातर्फे मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे .नाभिक समाज मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

Read More

आर जे एस कॉलेज मध्ये फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- आर जे एस कॉलेज फार्मसी कोकमठाण कोपरगाव येथे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज, कोकमठाण येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश वाणी, अविनाश जाधव, जितेंद्र गंगावळ, शामसुंदर डागा, नितीनजी दवंगे, प्रविणजी कदम, […]

Read More

समता पतसंस्थेचा सोनेतारण व्यवसायात ३०० कोटींचा टप्पा पार:- संदीप कोयटे, संचालक…

कोपरगाव प्रतिनिधी:- जगात अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोने तारण व्यवसायात समता नागरी सहकारी पतसंस्था २ वर्षात ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारी महाराष्ट्रातील अव्वल पतसंस्था ठरली आहे. सभासदांचा संस्थेवरील विश्वास व संस्थेतील अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त प्रणाली यामुळे अधिक वेगाने हा टप्पा पार करण्यात आला आहे. समताच्या एकूण कर्ज वाटपापैकी ५० टक्के कर्ज वाटप हे सोनेतारणाचे […]

Read More

कृषिक्रांतीचा स्वामी हरपला:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-हरितक्रांतीचे जनक, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, रॅमन मेगॅसेसे पुरस्कार विजेते माजी खासदार, पदमश्री मनकोम्बु संबासिवन उर्फ एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषीक्रांतीचा स्वामी हरपला अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनीही एम. एस स्वामीनाथन […]

Read More

मतदार संघाच्या विकासात जनतेचे मोठे योगदान:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही संधी दिली त्यामुळे मी आमदार होवू शकलो व मला मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराचा विकास साधता आला यामध्ये कोपरगावकरांचे व मतदार संघातील जनतेचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केले.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध गणपती मंडळांना भेटी देवून […]

Read More

“आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकलं पाहिजे; हे वाचनातूनच घडतं”:- मा. रामदास फुटाणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२७. “आपण आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकलं पाहिजे.हे वाचनातूनच घडतं. कारण वाचनामुळे दोन कानांमधील प्रदेश सुपीक होतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. संस्कृती घडते व संवाद वाढतो. स्व- जाणीव जागृत होते.निर्णय घेण्याची क्षमता तयार होते. म्हणूनच आपल्या मातृभाषेतील अनेक पुस्तके आणि कर्मवीर अण्णांचे जीवन चरित्र वाचले पाहिजेत.यासाठी नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. झपाट्याने बदलणाऱ्या […]

Read More

वैजापूर–श्रीरामपूर बससेवा पूर्ववत सुरू करा – टेके पाटील ट्रस्टची मागणी ,, वैजापूर आगार प्रमुख किरण धनवटे यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी: वैजापूर – श्रीरामपूर ( वारी, शिंगवे, पुणतांबा मार्गे ) बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नुकतीच वैजापूर आगार प्रमुख किरण धनवटे यांना निवेदन देत केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हंटले, कोपरगाव तालुक्यातील वारी, भोजडे, धोत्रे व तळेगाव मळे व राहाता तालुक्यातील शिंगवे या मार्गे वैजापूर आगारची श्रीरामपूरकडे […]

Read More

संजीवनी अकॅडमीची राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई:- डॉ. मनाली कोल्हे…

दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विजयी घौडदौड सुरू…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट संचलित संजीवनी अकॅडमीच्या तीन क्रीडापटूंनी ‘युथ गेम कौन्सिल ऑफ इंडिया’ ने हरियाणा मधिल सिंगु बॉर्डर येथे घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत चार सुवर्ण पदकांची कमाई करून संजीवनी अकॅडमीच्या शिरेपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवुन देशाच्या क्रीडा पटलावर संजीवनी अकॅडमीचे नाव कोरले […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ढोल-ताशा वादन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कोपरगावात भरपावसात घुमला ढोल-ताशांचा गजर,, पुढील वर्षी भव्य प्रमाणात ढोल-ताशा वादन स्पर्धा घेणार:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी: अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोपरगाव शहरात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘वाजवेल तो गाजवेल ढोल-ताशा वादन स्पर्धा-२०२३’ ला उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. कोपरगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात मंगळवारी (२६ सप्टेंबर) रात्री भरपावसात मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल-ताशा […]

Read More

कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

नव उद्योजकांचे स्वप्न साकार होण्यासाठी एमआयडीसीसाठी प्रयत्नशील:- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यासाठी एमआयडीसी सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीसाठी मंजूर असलेल्या १४.६९ आर. जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव […]

Read More