‘आपली खरेदी आपल्या गावात’ उपक्रमातून कोपरगावच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या शहराच्या बाजारपेठेला उर्जीतावस्था आणून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी शहरविकासाला प्राधान्य दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या खरेदीसाठी पुन्हा एकदा कोपरगाव शहरात येवू लागले आहे. यावर्षी दिवाळीच्या खरेदीसाठी आ. आशुतोष काळे यांनी ‘आपली खरेदी आपल्या गावात’ हा उपक्रम हाती घेतला असून त्या उपक्रमाला प्रतिसाद देवून व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनने […]

Read More

कोपरगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करा आ. आशुतोष काळे यांची मंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याबाबत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेवून या ४० तालुक्याबरोबर कोपरगाव तालुका व मतदार संघातील पुणतांबा महसुल मंडलातील गावे देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी करणार असल्याचे […]

Read More

बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांचा सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा , सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा:- कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी कोपरगाव येथे साखळी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजबांधवांची संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मंगळवारी भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच कोपरगाव विधानसभा […]

Read More

केवळ नवरात्रोत्सवातच नव्हे तर वर्षभर स्त्रीशक्तीचा आदर-सन्मान करा:- विवेकभैय्या कोल्हे , साई निवारा मित्रमंडळातर्फे आयोजितविविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, सप्तशृंगी माता मंदिराचा आठवा वर्धापन दिन उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:- नवरात्राच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव, देवीचे जागरण करणे ही आपली परंपरा आहे. दरवर्षी आदिशक्ती म्हणून नवरात्रोत्सवात स्त्री सामर्थ्याचा जागर व स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो. आपण लक्ष्मीच्या रूपाने स्त्रीकडे पाहिले पाहिजे. जर घरातील स्त्री सुखी नसेल तर ते घर सुखी राहू शकत नाही.केवळ नवरात्रोत्सवात नऊ दिवसच नव्हे तर वर्षभर ३६५ दिवस आपण स्त्रीशक्तीचा जागर आणि […]

Read More

सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचा पाठिंबा , सरकारने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊन न्याय द्यावा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सोमवारी (३० ऑक्टोबर) भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असून, सरकारने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण त्वरित देऊन न्याय […]

Read More

राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धा आयोजनाचा बहुमान समता इंटरनॅशनल स्कूलला:- एस. एम. बुक्के, धर्मादाय सहआयुक्त…

कोपरगाव प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलला देशातील सीबीएसई पुरस्कृत शाळांपैकी २०२३ – २४ ची ‘क्लस्टर ९ फुटबॉल चॅम्पियनशिप’ राज्य पातळीवरील स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला असून कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे धर्मादाय सह आयुक्त एस.एम. बुक्के यांनी सांगितले.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील कोकमठाण या ग्रामीण भागातील समता […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा ६१ वा गळीत हंगामाचा एक नोव्हेंबर रोजी शुभारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक निवृत्ती कारभारी बनकर व सौ. मंदाताई निवृत्ती बनकर या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी […]

Read More

कितीही संकटे आली तरी गणेश कारखाना यशस्वीरीत्या चालवू; हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लढ्याची गरज:- विवेकभैय्या कोल्हे…

गणेश साखर कारखान्याचे आ. बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन…कोपरगाव प्रतिनिधी:- काही मंडळी गणेश साखर कारखाना सुरळीत चालू नये म्हणून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहे. सभासद व शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे या संकटावर आम्ही निश्चितच मात करू. आज ‘गणेश’ चे धुराडे पेटले आहे. ‘गणेश’ च्या सभासदांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाला समाधानकारक […]

Read More

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघात हरभरा व गहु बियाणे विक्रीसाठी उपलब्ध….

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अहमदनगर यांनी चालु रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम जाहिर केला असुन त्यानुसार सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगांव येथे कृभको कंपनीचे १४० क्विंटल व महाबीजचे ७० क्विंटल हरबरा बियाणे शासन अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध असुन शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संजीवनी […]

Read More

अँड संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड झाल्याबद्दल कोपरगावात सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- अँड संदीप वर्पे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून कामकाज करत आहेत राष्ट्रवादीचे सर्वासर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते निकटवर्तीय समजले जातात त्यामुळे त्यांना पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे .त्यांचे कामकाज पाहून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे कोपरगाव मध्ये त्यांचे अनेकांनी सत्कार करून पुढील वाटचालीस […]

Read More