बेकरी व्यवसाय प्रशिक्षणातून उद्योजक निर्माण होणे विद्यापीठासाठी भुषणावह:- संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-अलीकडच्या काळात बेकरी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात होणार्‍या बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षणामुळे बेकरी व्यवसायाला चालणा मिळणार असून यामुळे गावपातळीवर आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे. बचत गटाशी संबंधीत महिला तसेच ग्रामीण भागातील तरुणांनी या बेकरी व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेवून स्वतःचा उद्योग उभारल्यास विद्यापीठासाठी भुषणावह ठरेल असे प्रतिपादन […]

Read More

अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत:- महंत रामगिरीजी महाराज….

श्री कृष्ण जन्मोत्सव नाट्यरूपाने साजरा होणार भाविकांना मिळणार अनोखी अनुभूती…कोपरगांव प्रतिनिधी:-प्रतिकूल परिस्थीतीत समाधान मानायला शिका, मनांवर ताबा ठेवा, साधना कधी सोडू नका, अध्यात्म व विज्ञानाचा संगम म्हणजेच भागवत होय असे प्रतिपादन श्री गोदावरी धाम (सराला बेट) चे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील […]

Read More

डॉ.अशोक गावित्रे यांना दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिनेअवॉर्ड 2024 पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय चित्रपट व दुरचित्रवाहिनी क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि कलाकारांना सर्वोत्तम कामगिरी बद्दल देण्यात येणारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अकॅडमी अॅवॉर्ड 2024 पुरस्कार सोहळा पुणे येथे संपन्न झाला ,याप्रसंगी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट व सीरियल मधील कलकारांनी उपस्थिति लावली ,या कार्यक्रमाचे उद्धघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजवनारे अभिनेते दीपक […]

Read More

के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी: स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी कोपरगांव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख, श्री. प्रशांत शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे हे उपस्थित होते.राष्ट्रीय मतदार दिनाच्या […]

Read More

आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार:-श्री कमलाकर टाक…

संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धा संपन्न….कोपरगांव प्रतिनिधी: स्वतः मधिल क्षमता ओळखा. प्रत्येकाकडे ज्ञान असतेच परंतु शहाणपण असेलच असे नाही. ध्येयाकडे जात असताना अडथळे येतील, त्यांना सकारात्मक माणुन त्यातुन शिकवण घ्या. कॉलेज हे परीवर्तनशिल जीवन शिकविते. जगण्याचे खरे युध्द ठराविक शिक्षण पुर्ण झाल्यावर सुरू होते. सध्याच्या काळात अनेक संधी आहेत. प्रत्येक संधी प्राप्त करण्यासाठी यशस्वीपणे […]

Read More

भक्तांच्या इच्छापुर्तीसाठी भगवंत नेहमी झटत असतात:- महंत रामगिरी महाराज…

कोपरगांव प्रतिनिधी:-भक्त नेहमीच ईश्वराकडे काहींना काही मागत असतो, भगवंताला भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याच्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतात असे प्रतिपादन गोदावरी धाम (सराला बेट) चे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भागवत […]

Read More

स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्य अमर आहे:- श्री सुमित कोल्हे…

स्व. कोल्हे यांच्या द्वीतिय पुण्यस्मरणा निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन करून लाखोंचे पोशिंदे बनले. गोरगरीबांना वैद्यकिय सेवा मिळावी, म्हणुन त्यांच्या संकल्पनेतुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आयुर्वेदा कॉलेजची मागील वर्षी स्थापना करण्यात आली. त्यांच्या नावाने सुरू केलेला फिरता दवाखाना महिन्याकाठी सुमारे ३००० रूग्नांना […]

Read More

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या स्मृती आरोग्यसेवेतून होत आहे जतन ,चासनळी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त चासनळी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थिती राहून तपासणी करून घेतली.या वेळी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून नागरिकांची आस्थेने विचारपूस केली व रुग्णांना दिलासा देत मोतीबिंदू दृष्टी दोष असलेल्या अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीला […]

Read More

कर्माची प्रामाणिकता हिच खरी भक्ती:- महंत रामगिरीजी महाराज ; हजारो भाविकांच्या साक्षीने श्रीमद् भागवत कथेची धार्मिक वातावरणात सुरवात…

कोपरगाव प्रतिनिधी :-स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या जीवन प्रवासात एक नाही अनेक क्षेत्रात काम केले नुसते काम केले नाही, त्या क्षेत्राला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे, एकाच व्यक्तीकडून सहकार, शिक्षण, पाणी, सामाजिक आदी अनेक क्षेत्रात इतक्या उत्तम प्रतीचे केलेले प्रामाणिक कार्य हे निश्चीतच ईश्वर भक्ती आहे, असे गौरोउद्गार महंत रामगिरी महाराज यांनी काढले आहे.ते […]

Read More

जळगाव पासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना जागा मिळवू न शकणारेजागा मिळविण्याचे श्रेय घेत आहेत:- दिलीपराव चौधरी…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- त्यांच्या कार्यकाळात जळगाव पासून दिल्लीपर्यंत सत्ता होती. त्यावेळी त्यांना पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मिळविता आला नाही ते जागा मिळविण्याचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे अशी टीका जळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिलीपराव चौधरी यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांवर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.प्रसिद्धी पत्रकात दिलीपराव चौधरी यांनी पुढे असे म्हटले […]

Read More