के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी: स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी कोपरगांव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख, श्री. प्रशांत शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे हे उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती शबाना शेख यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना लोकशाहीची भूमिका स्पष्ट करतांना मतदान करणे हे आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे सांगितले. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी निवडणुकांमध्ये आपला सहभाग नोंदवायला पाहिजे. तरुण व नवमतदार हे चाणाक्ष तसेच उत्साही असतात. त्यामुळे त्यांनी आपले नाव निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नोंदवुन मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले पाहिजे.
उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विषद करताना सांगितले की भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश असुन भारताला महासत्ता करावयाचे असेल तर सर्व नवमतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे.
प्रा. दीपक बुधवंत यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देतानाच निवडणूक आयोगाचा उद्देश व मतदारांची कर्तव्य नमूद केली. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मतदार जागृती साठी फलक हातात घेऊन मतदार जागृतीच्या घोषणा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. संदिप जगझाप, प्रा. गोरखनाथ डोंगरे, प्रा. भाऊसाहेब होन यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *