टाकळी जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड संपन्न:- माजी सभापती सुनिल देवकर…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती ची निवड पालक मेळावा घेऊन सरपंच संदिप भाऊ देवकर यांच्या अध्यक्षते खाली मा सभापती सुनील भाऊ देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
टाकळी गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी घालून दिलेली परंपरा कायम राखत गावची शालेय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाची निवड अतिशय शांततेने पार पाडली निवड करत असताना शासनाच्या नियमानुसारच करण्यात आली असुन त्यामध्ये सर्व युवकांचा समावेश करण्यात आला होता जेणेकरून शाळेची गुणवत्ता उच्च दर्जाची व्हावी आणि मुलांना चांगला ज्ञान मिळावे यासाठी विशेषा करून युवकांना संधी देण्यात आलेली आहे पालक मेळावा घेऊन अध्यक्षपदाची निवड करत असताना सर्व सदस्यांच्या संगम मताने अध्यक्षपदी संदीप आण्णासाहेब देवकर व उपाध्यक्ष गणेश बाबुराव नन्नवरे यांची निवड करण्यात आली.
सदस्य समिती सौ चित्रा खंडीझोड सौ जया मोकळ निसार तांबोळी सौ दिपाली थोरात दत्तात्रय गायकवाड सौ अनिता गांगुर्डे,किरण देवकर शिक्षणतज्ञ विठ्ठल पवार शिक्षक प्रतिनिधी प्रमोद रणधीर सचिव म्हणून मुख्याध्यापिका मदिना शेख मॅडम यांची निवड प्रक्रियेतून करण्यात आली


याप्रसंगी नवीन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करताना सरपंच संदीप भाऊ देवकर उपसरपंच संजय भाऊ देवकर माजी सभापती सुनील भाऊ देवकर ज्येष्ठ मार्गदर्शक छगनराव देवकर ग्रामपंचायत सदस्य गणेश कळसकर शशिकांत देवकर नारायण बर्डे उत्तम मालकर स्वप्निल देवकर सुनील पाईक लक्ष्मण मालकर सुनिल देवकर सुभाष देवकर आणि माजी अध्यक्ष बाबासाहेब पाटील देवकर केंद्रप्रमुख भोईर मॅडम मुख्याध्यापिका शेख मॅडम त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *