माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास रणशिंग यांची निवड…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास दत्तात्रय रणशिंग यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब विश्वनाथ पानगव्हाणे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास दत्तात्रय रणशिंग यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विकास रणशिंग म्हणाले की, मतदार संघाच्या विकासाची तळमळ असणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहेगाव देशमुख ग्रामस्थांचे विकासाचे प्रश्न सोडवून मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके यांनी काम पाहिले. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, मावळते उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, सदस्य भाऊसाहेब लांडगे, मच्छिंद्र जाधव, भीमराज रोकडे, सौ. कमल संभाजी काळे, सौ. प्रमिला दत्तात्रय काळे, सौ. वैशाली भागवत पानगव्हाणे, सौ. रुपाली शशिकांत पानगव्हाणे, सौ. लहानबाई मच्छिंद्र गावित्रे, सौ. बेबी अरुण गोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच विकास रणशिंग यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

चौकट :- राजकारणात दिलेला शब्द पाळणारे ‘काळे कुटुंब’ अशी काळे परिवाराची जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगळी ओळख आहे. काळे कुटुंबियाचा आदर्श घेवूनच मी माझ्या पदाचा राजीनामा देवून मी देखील दिलेला शब्द पाळला असून मी काळे कुटुंबाचा कार्यकर्ता असल्याचा मला आभिमान आहे. माझ्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळात आमचे नेते आ. आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुख येथे माहेगाव देशमुखसह लगतच्या अकरा गावातील नागरिकांना कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले व आज या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम देखील प्रगतीपथावर असून हे काम माझ्या कार्यकाळात सुरु झाले याचे मोठे समाधान मिळत आहे. – मावळते उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *