कोपरगाव -कोरोनामुक्त झाल्यावर स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागत…

अहमदनगर

कोपरगाव -कोरोनामुक्त झाल्यावर स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागत
कोपरगाव (प्रतिनिधी ) :- शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना योग्यतो उपचार कोपरगाव तालुक्यात कोविड हॉस्पिटल च्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवला जात आहे.त्यात काही रुग्ण हे खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊन सुद्धा उपचार घेता आहे. लवकर उपचार घेतल्याने करोना सारख्या गंभीर आजारावर मत करता येते.सध्या तालुक्याचा रिकवरी रेट अतिशय चांगला असून तो सध्या ९५.६४ % वर पोहचला आहे.
अशातच कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील सर्वांचे लाडके असलेले समाज सेवक सलीम भाई पठाण यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन झाल्या नंतर परिसरात खळबळ उडाली.त्यांना कोपरगाव येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.त्यांना पूर्वी पासून बिपी आणि शुगर सारख्या आजाराजी बाधा असल्याने त्यांचावर योग्य उपचार म्हणून परिवाराने त्यांना दि.१६ डिसेंबर रोजी औरंगाबादला एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचासाठी भरती केले. तब्बल १५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यात त्यांची प्रकृती सुद्धा खालवली होती परंतु जनतेचा आशीर्वाद असल्याने अखेर त्यांनी कोरोनाचा पराभव करून ते घरी सुखरूप परतले.अशी भावना परिवाराने यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांचे स्थानिक रहिवासी व परिवाराने फुलांचा वर्षाव करून,गुलाब पुष्पा देऊन आणि वाजत गाजत उस्फूर्तपणे स्वागत केले. या वेळी उपस्थित दिनेश कांबळे,विवेक सोनावणे, भाऊसाहेब भाबड,ठकाजी लासुरे,दीपक पंजाबी,राजेंद्र लोखंडे,व आदि मान्यवरांनी करोना मुक्त सलीमभाई यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *