सी.ए. फाउंडेशन परीक्षेत के. जे. सोमैया महाविद्यालयाचे यश…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- के जे सोमैया महाविद्यालयातील कु. साक्षी संजीव गाडे (द्वितीय वर्ष वाणिज्य) व कु. कविता बाबासाहेब आभाळे (प्रथम वर्ष वाणिज्य) या दोन विद्यार्थिनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेतर्फे जुलै -२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन या परीक्षेत नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत , ही सोमय्या महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली. डॉ. यादव पुढे म्हणाले की, महाविद्यालयातील वाणिज्य विभाग स्थापनेपासून महाविद्यालयाच्या नावलौकिकात सातत्याने भर घालत असून त्यामुळे महाविद्यालयाचे नाव अधिक उज्वल होत आहे. आतापर्यंत विभागातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. अशी माहिती वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. आर. पगारे यांनी दिली. सदर विद्यार्थिनींना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. एस. आर. पगारे, डॉ. एस. एल. अरगडे, प्रा. आर. ए. जाधव, प्रा. अजित धनवटे, प्रा. कु. वर्षा पाचोरे, प्रा पूजा कापसे, प्रा. गणेश जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले. सदर विद्यार्थिनींनी ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे , सचिव मा . ॲड . संजीवदादा कुलकर्णी , विश्वस्त मा. संदीप रोहमारे , प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रा. विजय ठाणगे व कार्यालयीन अधिक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *