पंचायत समितीच्या फर्निचरसाठी १ कोटी ६६ लाख निधी मंजूर:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचरसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून ग्रामविकास विभागाने पंचायत समितीच्या फर्निचरसाठी १ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

                    माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील अनेक शासकीय इमारतींची कामे मार्गी लावली आहेत. या शासकीय इमारतींनी कोपरगाव शहराची शोभा वाढविली. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामासाठी पंचायत समितीमध्ये यावे लागते. नागरिकांची कामे खोळंबून राहू नये यासाठी माजी आ. अशोकराव काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगल्याप्रकारे काम करता यावे व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावे या उद्देशातून सर्व सोयीयुक्त फर्निचर होणे गरजेचे होते. त्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारच्या ग्रामविकास विभागाने तब्बल १ कोटी ६६ लाख निधी दिला आहे. या इमारतींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून फर्निचरसाठी निधी उपलव्ध झाल्यामुळे हे प्रशासकीय कार्यालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. पंचायत समितीच्या फर्निचरसाठी १ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांचे आ.आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.
         कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आजपर्यंत कोरोनाच्या संकटात देखील जास्तीत जास्त निधी आणला आहे. यापुढेही मतदार संघासाठी मोठ्याप्रमाणावर निधी मिळविण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *