कोपरगाव प्रतिनिधी:- अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत युवा प्रकोष्ट संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. गगन जी हाडा यांची निवड झाली करण्यात आली.गगन जी हाडा हे कट्टर शिवसैनिक असून ते साध्या कोपरगाव शिवसेना उपशहर प्रमुख आहेत. जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्धल त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष. व महात्मा चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी मंगेश पाटील यांनी त्यांच्या सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी स्वच्छता दुत व सरकार नियुक्त समन्वयक, कोरोना योद्धा श्री.सुशांत भाऊ घोडके हे उपस्थित होते. सामाजिक कामात गगन जी हाडा हे सतत पुढे असतात.त्यांच्या निवडी बद्धल सर्वे समाजा कडून व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
