
कोपरगाव प्रतिनिधी:- मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. अशोक (आण्णा) रोहमारे, संस्थेचे सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त श्री. संदीप रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. बी . आर. सोनवणे, जिमखाना समितीचे चेअरमन श्री. जी. एन. डोंगरे, श्री. एस. बी. जगताप, श्री. डी.एस. बुधवंत व शारीरिक शिक्षक श्री. एम. व्ही. कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या चारित्र्याविषयी बहुमोल माहिती सांगितली व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला. सदर कार्यक्रम प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. जिमखाना समिती चेअरमन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
