कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रकार रविंद्र कांबळे यांना राज्यस्तरीय वामनदादा कर्डक पुरस्कार…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२४ ऑगस्ट २०२१ रोजी कोपरगाव येथील मूकबधिर विद्यालयात कार्यरत असलेले राष्ट्रीय चित्रकार रवींद्र कांबळे सर यांना वैजापूर येथे लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई व सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने काल वामनदादा कर्डक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र कांबळे सरांनी मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले असून त्यांना आपल्या अथक परिश्रमातून एक वेगळी दृष्टी प्राप्त करून दिली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना त्यांच्या कलाकृती देश व परदेशात पाठवल्या सामाजिक कार्यात सरांचा भरीव सहभाग असल्याने त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे सर नगराध्यक्ष सौ शिल्पाताई परदेशी रवींद्र आप्पा साखरे कार्याध्यक्ष अशोक बागुल प्रांत ऑफिस कक्ष अधिकारी दिपकराव त्रिभुवन आरटीओ अधिकारी अक्षय जगधने साठे साहेब आदर्श शिक्षक बलभीम ऊल्हारे रवींद्र शेलार आदी उपस्थित होते. मूकबधिर विद्यालयाचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुधीर जी डागा सेक्रेटरी एडवोकेट संजीव कुलकर्णी संस्थेचे विश्वस्त संदीप दादा व सुजित दादा रोहमारे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कराव गुरसळ व सर्व शिक्षकांनी रवींद्र कांबळे सरांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *