कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतांना फायदेशीर आणि दर्जेदार शेती करणे मोठे आवाहन असून हे आवाहन पूर्ण करण्यासाठी शेतीसाठी दर्जेदार रोपांची नितांत गरज असून शेतकऱ्यांची हि गरज शासनमान्य रोपवाटीकेतून पूर्ण होणार असून त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या रोपवाटिकेचा लाभ घ्यावा असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील प्रगतीशील शेतकरी दिलीप शिंदे यांच्या शासनमान्य सुदिशिनी ॲग्रो हायटेक भाजीपाला रोपवाटिकेचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी रोपवाटिका योजनेची माहिती दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेतून तालुकास्तरावर एका शेतकऱ्यास सोडत पद्धतीने रोपवाटिका देण्यात येते. त्यासाठी तालुक्यातून एकूण १२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये दिलीप शिंदे यांची सोडत पद्धतीमध्ये नाव आले त्यांनी सर्व बाबींची पूर्तता करून त्यांना हि रोपवाटिका देण्यात आली असल्याचे सांगितले. दिलीप शिंदे यांनी जेऊर कुंभारी गावातील सेंद्रिय गटाचे प्रमाणीकरण कामाबाबत माहिती दिली तसेच भाजीपाला रोपांबरोबरच दर्जेदार फळझाडे,शोभिवंत झाडाची रोपे, ऊस रोपे या नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सभापती सौ.पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, संचालक आनंदराव चव्हाण, सचिन रोहमारे,रोहिदास होन ,गोदावरी खोरे केन व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे एक्झिक्युटिव्ह, संचालक,जनरल मॅनेजर व कर्मचारी वृंद,गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते, वसंतराव आव्हाड,केशवराव जावळे, विठ्ठल जावळे, खादी ग्रामोद्योगाचे चेअरमन राजेंद्र पगारे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिन शिंदे,अशोक आव्हाड, मयुर गिरमे, दत्तात्रय आव्हाड,रामदास शिंदे, रामचंद्र सानप, पाटीलबा वक्ते ,विजयराव जाधव ,कल्याण गुरसळ, राजेंद्र गिरमे ,बापूसाहेब वक्ते ,महेंद्र वक्ते,विशाल गुरसळ, जगन लिंभूरे ,एस.एम वक्ते,पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय बारसे ,विरेंद्र शिंदे,सोन्याबापु शिंदे,विजय शिंदे, किरण शिंदे, सुरेश शिंदे, पोपट शिंदे, सुधीर शिंदे, संदीप शिंदे, विक्रम शिंदे ,संतोष शिंदे ,बापू शिंदे, अँड.निलेश आव्हाड, अँड निलेश कातकडे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, सहाय्यक तालुका कृषी अधिकारी मनोज सोनावणे, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, कृषी सहाय्यक संजय धनकुटे, गावित, जाधव, घारकर, श्रीमती निर्मला सोनवणे, वसंत पावरा, आत्माचे शैलेश आहेर आदीउपस्थित होते.कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

फोटो ओळ:- शासनमान्य सुदिशिनी ॲग्रो हायटेक भाजीपाला रोपवाटिकेचे उद्घाटन करतांना आ. आशुतोष काळे.
