
कोपरगाव प्रतिनिधी:- जळगाव जिल्हा पालकमंत्री माननीय श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते(प्रा डॉ नरेंद्र महाले अ.भा.जिवा सेना जिल्हा सचिव भुसावल यांची कन्या ) महाराष्ट्राची शिववक्ता कुमारी हंसिका नरेंद्र महाले हिचा भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला, आजपर्यंत आपण सर्व समाज बांधवांनी हंसिकाच्या व्हिडीओला प्रतिसाद देऊन आशिर्वाद दिले आणि यापुढेही द्याल ही नम्रपणे विनंती करतो. हंसिकाने देखील खूप मेहनत घेतली आहे.

इतर समाजाच्या मुलांशी चांगलीच स्पर्धा करते आहे. आजवर महाराष्ट्राचा शिववक्ता, महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी, आयडीयल वक्ता2021,या उपाध्या तिला मिळाल्या आहेत. सहा राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.आजवर 21 देशांमध्ये हंसिकाचा वक्तृत्वाचा व्हिडिओ बघितला गेला आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनंदन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने आज भुसावळच्या कार्यक्रमात अवचित्त साधून आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील यांनी हंसिकाचा सत्कार करून आशिर्वाद दिला. अशा समाजातील गुणीमुलांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. एक दिवस ही नाभिक कन्या समाजाचे व परिवाराचे नाव उज्वल करेल तिला आपल्या समाजाचे सहकार्य मार्गदर्शन व आशीर्वादाची गरज आहे अशा काही स्पर्धा असतात तिथे समाजाची गरज असते व यानेच समाजाचा नाव लौकीक होतो हंसिकाला आमच्या देविदास फुलपगारे परिवारातर्फे व अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी जिल्हा जळगाव तर्फे पुनःश्च खूप खूप शुभाशीर्वाद,अभिनंदन हंसिका ला अप्रत्यक्ष रीत्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे सामाजिक बांधिलकी या नात्याने मनःपूर्वक आभार,धन्यवाद
देविदास फुलपगारे = जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा जळगाव
