
कोपरगाव प्रतिनिधी:- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांचा वाढदिवस तालुक्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला

देश कोरोनाच्या संकटात आहे राज्यात पुराचे थैमान सुरु आहे शेतकरी कष्टकरी संकटात आहे अशा वेळी बडेजाव न करता मोठमोठे बॅनर न उभारता लोकाभिमुख सामाजिक काम करुन गाव तेथे शिवसेना शाखा स्थापन करून गावागावात शिवसेनेचे कार्य पोहचवावे अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केले होते त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील विविध गावात तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियाना बरोबरच शिवसेना शाखेचे बोर्ड उदघाटन करून तसेच वृक्षारोपण,प्राथमिक शाळेला मदत करून लहान बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले व वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला

ब्राम्हणगाव येथे शिंदेवस्ती शाळेत तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या संपुर्ण इमारतीला रंगकाम या कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी अध्यक्षस्थाना वरून बोलताना शिवाजीराजे ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दवसाहेबांनी देशात अव्वल दर्जाचे काम करून एक वेगळा इतिहास रचल्याचे सांगत संकटात सापडलेल्या राज्याला संयमी कर्तृत्ववान मुख्यमंत्री निश्चितच पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाप्रमुख मा प्रमोद अण्णा लबडे यांनी शाळेचे शिक्षक श्री पठाण सर, श्री वायखिंडे सर यांचे काम चांगले असल्याने शाळा सुस्थितीत असुन त्यांनी केलेल्या मागणीनुसार वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेला आवश्यक फर्निचर भेट देऊन यापुढे पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांना अभिप्रेत असणारे काम तालुक्यात करुन शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
यावेळी मळेगाव-थडीचे जेष्ठ शिवसेना नेते तिरोड्याचे संपर्क प्रमुख प्रविणजी शिंदे यांनी शिवसेनेची शिकवण ८०% समाजकारण व २०% राजकारण अशी असल्याने विभागप्रमुख सचिन आसने यांच्या प्रमाणे आपणांस गावागावात असंख्य शिवसैनिक तळागाळातील लोकांसाठी काम करताना दिसतात असे सांगुन मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पठाण सर यांनी तर प्रास्तविक सचिन आसने यांनी केले
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका सचिव अशोकराव कानडे , तालुका कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात ,माजी तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे ,शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख किरण खर्डे ,उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे, सचिन आसने ,सुनिल माकोने, भाऊराव लोखंडे, छबुराव शिंगाडे,प्रकाश कडवे, कालेकर,कृष्णा दोडे, दत्तु वाकचौरे, कैलास आसने, दगु शिंगाडे यांचे सह शिवसैनिक, युवक, ग्रामस्थ, विध्यार्थी उपस्थित होते
