
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव वार्ताहर:- कोपरगांव पिपल्स बॅक ही सहकार क्षेत्रातील जुनी बॅक असुन कोपरगांव तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण अहमदनगर जिल्हयातील नावारुपास आलेली बॅक आहे. या भागातील गरजुंना वेळोवेळी अर्थसहायय, पतपुरवठा करुन कोपरगांव येथील बाजारपेठ उभारणीत या बॅकेचा मोठा वाटा असुन नागरी बॅकांमध्ये आदर्श प्रस्थापीत केला असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार डाॅ. सुधीरजी तांबे यांनी आज बॅकेस सदिच्छा भेटीत सांगीतले. बॅकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचे निवड निमीत्ताने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच बॅकेस सदिच्छा भेट देण्यासाठी ते कोपरगांव येथे आले होते. सदर प्रसंगी त्यांनी अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा बॅकेचे अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सत्कार करण्यात आला सोबत संगमनेर येथील संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणिप्रसाद मुंदडा हेही उपस्थित होते. यावेळी सुधीरजी तांबे यांनी बॅकेचे कार्यपध्दतीची माहिती घेतली तसेच अध्यक्ष सत्येन मुंदडा हे लायन्स क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष व कोपरगांव न.पा. सदस्य असुन त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्याचा निश्चीतच फायदा बॅकेचे प्रगतीसाठी होणार असुन त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. सदर भेटीवेळी बॅकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक श्री कैलासचंद ठोळे यांनी प्रथमता प्रास्तावीक करुन सध्या सहकारी बॅकांबाबत रिझव्र्ह बॅकेचे असलेला दृष्टीकोन, नविन होत असलेले घटनाबदल व बाजारातील असलेले मंदीचे वातावरण याबाबत चर्चा केली. बॅकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सदर भेटीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन केलेल्या सत्काराबद्दल ऋण व्यक्त केले. याप्रसंगी श्री माधवरावजी देशमुख, जिल्हा काॅग्रेसचे उपाध्यक्ष तुषारजी पोटे, बॅकेचे उपाध्यक्ष सौ. प्रतिभा शिलेदार, संचालक सर्वश्री डाॅ. विजय कोठारी, सुनिल कंगले, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, सुनिल बंब, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, रविंद्र ठोळे, यशवंत आबनावे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड उपस्थित होते.
