

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 24/6/2021रोजी मला पंचायत समितीच्या विशेष शिक्षक सेविका सोनल भावसार यांनी मला फोन केला एकरुखे गावात बोरावके वस्ती जवळ जिल्हा परिषद शाळेच्या प्रमुख गेटवर एक निराधार वयोवृद्ध आजी आहे त्यांना साईआश्रय मिळेल का ? तेव्हां आम्ही लगेच तेथे पोहोचलो आणि आजीला पाहून धक्काच बसला आजीचे वय अंदाजे ८० वर्ष अत्यंत दयनीय परिसथितीमधये आजी तिथे रोडवर बसलेल्या होत्या आजींना कुष्ठरोग झालेला आहे व त्या एका डोळ्याने अंध आहे तसेच या माउलीला कृष्टरोग असल्याने रस्त्यावर सोडले असावे अशी दयनीय परिस्थिती पाहून खूपच वाईट वाटले


आजीने फाटक्या आवाजात नाव सांगितले पार्वताबाई नळे मी खूप दिवसापासून येथेच राहते तेथील ग्रामस्थ शिवाजी क्षीरसागर तेथे उपस्थित होते त्यांनी ही तिची माहिती दिली की नातेवाईक असुन तीला मारहाण करतात त्या मुळे ती येथे राहते या माउलीला कृष्टरोग असून अजून औषोधोपचार मिळाले नाही किती वाईट परिस्थिति चे जीवन जगत आहे आज माणुसकी कुठे जात आहे या आजींना एक साधी गोळी आज पर्यंत मिळाली नाही तेव्हा कोविड ची लस तर फार लांब आहे कुठे चाललीय माणुसकी आपली? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही सर्व माहिती घेतल्यानंतर आजींना साईआश्रय द्यायचे ठरविले आजीही लगेच यायला तयार झाल्या तेव्हा लक्षात आले की आजींना कमरेचा त्रास असल्याने दोन हात खाली ठेऊन चालावे लागते पण इतका त्रास असूनही आजी कणखर आहेत कारण या माऊली सोबत साईबाबा आहेत यातून हे दिसून येते यानंतर आम्ही त्यांना साईआश्रयात आणले आजींना अंघोळ घालून भोजन देन्यात आले आज आजींना राहता ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार घेणे कामी जात आहोत अशा प्रकारे आजींना साईआश्रय मिळाला अशा सर्व आजी आजोबांना पुढील आयुष्य सन्मानाने जगता यावे अशी साईबाबा चरणी प्रार्थना
ओम साई राम..! साई सेवक:-गणेश दळवी. मो – ९६३७५४९३००
