

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले साहेब यांचे एक व्यक्ती एक झाड संकल्पनेची देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने आज पासून सुरुवात करणेत आली. येथून पुढे कोणत्याही व्यक्तीचा सन्मान करताना त्यांना वृक्ष भेट देऊन सन्मान केला तर भविष्यात कोरोना सारख्या महामारीत नैसर्गिक प्राणवायूची कमतरता भासणार नाही. असे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले. देवळाली प्रवरा येथील सहारा शासकीय मोफत कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा सन्मान प्रसंगी ते बोलत होते.


कोविड काळात कोरोना रुग्णांची सेवा करताना विशेष योगदान दिले बद्दल देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने आज सहारा मंगल कार्यालयात सुरू असलेल्या शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये विशेष योगदान दिले बद्द्ल येथील सर्व कर्मचाऱ्यांचा वृक्ष भेट देऊन कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला.
देवळाली प्रवरा येथील सहारा मंगलकार्यालयात सुरू असलेल्या शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये पूर्ण वेळ सेवा देऊन खऱ्या अर्थाने कोरोना योध्याची निःस्वार्थ भूमिका बाजावल्या बद्दल त्यांचे कौतुक होणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले साहेब यांचे एक व्यक्ती एक झाड संकल्पना अमलात आणणे गरजेचे असून त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी म्हणून येथील कोरोना योध्यांचा देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने वृक्ष भेट देऊन सन्मान करताना मला आज विषेश आनंद होत आहे. असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. दत्तात्रय कडू पाटील यांनी केले.
या प्रसंगी अमजद इनामदार यांचा मा. दत्तात्रय कडू पाटील यांचे हस्ते शाल व गुलाब वृक्ष भेट देऊन कोरोना योद्धा सन्मान करण्यात आला तर सहारातील सर्व डाॅक्टर व नर्स यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, अनिस शेख आदीं मान्यवरांचे हस्ते गुलाब रोप देऊन या कोराना योध्यांचा देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने कृतज्ञता व्यक्ती केली.
कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी प्रशांत कराळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
