उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसीएशन च्या अध्यक्षपदी अनिल चव्हाण, तर सचिव पदी नितीन डोंगरे यांची निवड..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
उत्तर महाराष्ट्र कर सल्लागार असोसीएशन च्या अध्यक्षपदी  अनिल चव्हाण,  तर सचिव पदी नितीन डोंगरे यांची निवड.
अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार कार्यक्षेत्र असलेल्या  उत्तर  महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनची पहिली कार्यकारिणी सभा शुक्रवारी  दृकश्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आलं आली होती त्यावेळी  कार्यकारिणीची एकमताने  निवड करण्यात आली . त्यात अध्यक्ष पदी  अनिल चव्हाण राहणार नासिक यांची तर  उपाध्यक्ष पदी  अल्ताफ  हासमानी  (नंदुरबार) यांची  निवड करण्यात आली .  सचिव पदी कोपरगावचे नितीन डोंगरे यांची निवड करण्यात आली . तर .बालचंदजी छाजेड  (मालेगाव): खजिनदारपदी, अनिल शहा  (जळगाव) सहसचिव ,महेशजी बाफना  (धुळे)संयोजक पदी  तर संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून किशोरजी गांधी  (अहमदनगर) , प्रदीप सफळ  (जळगाव) , रंजन चव्हाण  (नासिक) आणि   शिवकुमार डोंगरे  (धुळे)  धनेश लूणावत  (नंदुरबार) यांची एकमताने निवड करण्यात  आली.  संस्थेच्या वतीने आगामी वर्षात उत्तर महाराष्ट्रातील कर सल्लागारांसाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आल्याचे सचिव नितीन डोंगरे यांनी सांगितले. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *