श्री.संत सावता माळी युवक संघांचे वतीने सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांचा सत्कार..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नागरी हक्क संरक्षण विभाग अहमदनगर विभागात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे व नुकतेचे सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र राधाकृष्ण लोखंडे यांचा श्री संत सावता माळी युवक संघाचे वतीने जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संघाचे कोपरगाव सचिव योगेश ससाणे,रविंद्र आबक,दीनेश बोरनारे व प्रकाशजी जमधडे ऊपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावचे भुमिपुत्र असलेले सेवानिवृत पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांचे
जनता ईग्लिंश स्कुल संवत्सर, के,जे सोमय्या महाविद्यालय व एस एस जी एम काॅलेज कोपरगाव येथे झाले असुन
सन 1989 मध्ये B. Com केल्यानंतर पुढे MPSC स्पर्धा परीक्षा पास करुन 1990 साली महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पुर्ण करुन 1991 ते 1996 पर्यंत नागपुर शहर येथे तर1996 ते 2000 पर्यंत नाशिक शहर तसेच 2001 ते 2005 पर्यंत औरंगाबाद ग्रामीण 2006 ते 2008 जळगाव जिल्हा 2008 ते 2010 ठाणे शहर 2010 ते 2014 सी आय डी क्राईम 2014 ते 2017 जात पडताळणी समिती धुळे नंदुरबार तर शेवटी 2018 ते 31/05/2021 पर्यंत नागरी हक्क संरक्षण विभाग अहमदनगर येथुन वरीष्ठ पोलीस निरीक्षकपदी सेवा बजावुन सेवानिवृत्त झाले आहेत.
शेतकरी कुटंबातुन जन्माला आलेले लोखंडे यांनी जिद्ध आणी चिकाटीच्या जोरावरआलेल्या सर्व संकटांशी सामाना करत आपले ध्येय गाठले असुन समाजात आपले एक वेगळस्थान निर्माण केले असुन युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मुकुंद मामा काळे यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *