कोपरगावात अजिंक्य मल्टीस्टेटच्या नूतन मुख्य शाखा इमारतीचा सोमवारी लोकार्पण सोहळा…

कोपरगाव प्रतिनिधी:- विश्वास, सहकार्य आणि आर्थिक प्रगतीचा ध्यास घेऊन सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अजिंक्य मल्टीस्टेटच्या प्रगतीच्या प्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला जात आहे. आई जगदंबेच्या कृपेने आणि सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांच्या विश्वासाच्या बळावर अजिंक्य मल्टीस्टेटच्या नूतन हेड ऑफिस व मुख्य शाखेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अजिंक्य मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे चेअरमन उत्तमराव औताडे यांनी दिली.
सहकार क्षेत्रात काम करताना केवळ आर्थिक व्यवहार करणे नव्हे, तर सामान्य माणसाच्या आर्थिक स्वप्नांना बळ देणे, व्यापारी वर्गाला आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणे आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीच्या वाटचालीत विश्वासू साथीदार म्हणून उभे राहणे, हे महत्त्वाचे असते. याच भावनेतून वाटचाल करणाऱ्या अजिंक्य मल्टीस्टेटसाठी नूतन मुख्य कार्यालयाची उभारणी हा केवळ वास्तूचा लोकार्पण सोहळा नसून संस्थेच्या आजवरच्या मेहनतीचा, विश्वासाचा आणि उज्ज्वल भविष्याच्या संकल्पाचा महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास मठाधिपती व संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे परमपूज्य महंत श्री रमेशगिरी महाराज यांचे शुभहस्ते आशीर्वाद लाभणार आहेत. त्यांच्या पावन उपस्थितीमुळे या मंगल सोहळ्याला आध्यात्मिक अधिष्ठान लाभणार असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वादांची शिदोरी मिळणार आहे.
या प्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, कोपरगाव विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे, गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे , कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सहकार क्षेत्रातील मान्यवर, राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यावसायिक, सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.
कोणतीही संस्था मोठी होते ती केवळ भव्य इमारतीमुळे नाही, तर त्या संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या माणसांमुळे! ग्राहकांचा विश्वास, सभासदांचे सहकार्य, कर्मचाऱ्यांची मेहनत आणि संचालक मंडळाचे नियोजन या सर्वांच्या बळावर संस्थेची वाटचाल अधिक सक्षम होत असते.अजिंक्य मल्टीस्टेटच्या नूतन हेड ऑफिस व मुख्य शाखेची इमारत ही याच सामूहिक प्रयत्नांची आणि प्रगतीच्या ध्यासाची साक्ष ठरणार आहे. आधुनिक सुविधा, ग्राहकांना सोयीस्कर सेवा आणि आर्थिक व्यवहारांसाठी अधिक सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या नव्या वास्तूचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
‘आर्थिक प्रगती… सर्वांप्रती!’ हे ब्रीद जपत समाजातील विविध घटकांना आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा संकल्प या नव्या पर्वातून अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कोपरगाव हे सहकार, उद्योग, व्यापार आणि सामाजिक उपक्रमांची समृद्ध परंपरा लाभलेले शहर आहे. या भूमीत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संस्थांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अजिंक्य मल्टीस्टेटच्या नूतन मुख्य कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संस्थेच्या प्रगतीबरोबरच कोपरगावच्या सहकार क्षेत्रासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.
नव्या वास्तूतून संस्थेच्या कामकाजाला अधिक व्यापक स्वरूप मिळावे, ग्राहकांना उत्तम सेवा मिळावी आणि विश्वासाच्या नात्याला अधिक बळकटी मिळावी, हीच या सोहळ्यामागील अपेक्षा आहे.
अजिंक्य मल्टीस्टेटचे चेअरमन उत्तमराव पंढरीनाथ ओताडे व अजिंक्य मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने या आनंदसोहळ्यास सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी, सभासदांनी, ठेवीदारांनी, ग्राहकांनी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून संस्थेच्या आनंदात सहभागी व्हावे, असे सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.
सोहळ्याचे ठिकाण : अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, पीटर इंग्लंड शोरूमशेजारी, येवला रोड, कोपरगाव.
दिनांक : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता.
