Uncategorized

सडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे नितीन बारहाते यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. अनिता संतोष बारहाते यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे लोकनियुक्त सरपंच सौ.आशाताई सूर्यभान बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रिक्त उपसरपंच पदासाठीच्या निवडणुकीत नितीन अंकुश बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आलेल्या ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी नितीन अंकुश बारहाते यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच नितीन बारहाते यांचा सरपंच व सर्व सदस्यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बापूराव बारहाते, अशोक बारहाते, सडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.आशाताई बारहाते, अनिल बारहाते, ग्रामपंचायत सदस्य सौ. मीरा बारहाते, सिद्धार्थ मोकळ, गणेश बारहाते, विजय बारहाते, सतीश बारहाते, सुनील बारहाते, रमेश वाकचौरे, संजय बारहाते, छबुराव बारहाते, प्रभाकर बारहाते, संतोष बारहाते, दिगंबर लोहकणे, संदीप बारहाते, सागर बारहाते, सुदाम बारहाते, योगेश बारहाते, सुभाष बारहाते, पोपट बारहाते, दिपक बारहाते,गोकुळ बारहाते आदी मान्यवरांसह ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी सागर बारहाते, साक्षी पाडेकर उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच नितीन बारहाते यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच नितीन बारहाते म्हणाले की, सडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांच्यासह सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांच्या सहकार्याने सडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन. गावातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे आणि शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ पात्र गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविणे याला माझे प्राधान्य राहील. सर्वांना सोबत घेऊन सडे गावाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *