के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन….

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व कोपरगाव पोलिस स्टेशन चे पी.एस.आय. श्री. साईनाथ वर्पे साहेब हे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना वेळेचे नियोजन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अपयश ही यशाची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे व आपले उद्दिष्ट साध्य करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे तसेच वाणिज्य विभागप्रमुख प्रो. (डॉ.) एस. आर. पगारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रो. (डॉ.) जी. एस. शिंदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रो. (डॉ.) एस.आर. देवरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नीता शिंदे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. एस. नागरे यांनी मानले. यावेळी डॉ. आर. बी. तलवारे, डॉ. बी. डी. गव्हाणे, प्रो. (डॉ.) व्ही. एस. साळुंके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
