Uncategorized

‘सूर्यतेज’ संस्थेच्या वतीने वहीवाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वही, चित्रकला वही आणि सिसपेन्सिल, रंग साहित्य मोफत वितरण करण्यात आले आहे. सलग २५ वर्षापासून सामाजिक बांधिलकी भावनेने शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून कुठलाही जाहीर कार्यक्रम न घेता सूर्यतेज संस्था हा उपक्रम राबवत आहे.
“सूर्यतेज” संस्थेची स्थापना “आषाढी एकादशी” या दिवशी करण्यात आली आहे. ‘उजळूया अंधार सारा’ हे ब्रीद साकार करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली २५ वर्षापासून शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, सामाजिक, स्वच्छता,जलशक्ती,वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान,वस्तु वाटप या सारखे उपक्रम लोकसहभागातून आणि संस्थेच्या सदस्य आणि लोक सहभागातून आदर्शवत राबविण्यात येत आहे.
यावर्षीही कोपरगांव येथील शिशु विकास मंदिर, विद्या प्रबोधनी शाळा, न. पा. शिक्षण मंडळ शाळा, गीता प्रशाला, पद्मा मेहता कन्या विद्या मंदिर, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर, श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, एस. जी. विद्यालय, के.बी.पी.विद्यालय येथे वही वाटप करण्यात आले आहे.

वही उपक्रमात सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, मार्गदर्शिका प्रा. लताताई भामरे, अनिल अमृतकर सर, अॅड. स्मिताताई जोशी, प्रा.मसुदाताई दारूवाला, प्राजक्ता राजेभोसले, सुमित शिंदे, डॉ. निलीमाताई आव्हाड, अॅड. महेश भिडे, रविंद्र भगत, ऐश्वर्या वाघमारे, अनंत गोडसे, वर्षाताई जाधव, प्रा. मायाताई रक्ताटे, कल्पनाताई गीते, मंगेश भिडे, अमोल पवार, अतुल कोताडे सर, महेश थोरात, शिरीष धनवटे, प्रा. वासंतीताई गोंजारे, आनंद टिळेकर, कल्पेश टोरपे यांचेसह सूर्यतेज संस्थेच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.

सूर्यतेज संस्था, कोपरगांव विविध उपक्रम सन २००१ पासून…
★ शैक्षणिक→ शालेय गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप, गणवेश वाटप, चप्पल वाटप, अनाथांना मदत कार्य, गुणवंत शोध स्पर्धेचे आयोजन, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी (SC, ST आणि सर्वसाधारण ) AI आणि रोबोटिक मोफत प्रशिक्षण…

★ सामाजिक→ भारतीय सैन्य दलातील जवानांचा तसेच शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदत कार्य, उपेक्षित व निरक्षर यांना शासन योजनांची माहिती देणे, बचत खाते, विमा संरक्षण प्रबोधन, मतदार जनजागृती अभियान, आधार ओळखपत्र शिबीर आयोजन…

★ कोपरगांव फेस्टिव्हल→ दीपावली पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी स्पर्धेचे भव्य आयोजन, समुहनृत्य सादरीकरण, गंमत-जंमत मनोरंजन…..

★ कला, साहित्य, नाट्य → चित्रकला स्पर्धा,भेटकार्ड स्पर्धा, चित्र प्रदर्शन, प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा, मराठी भाषा दिन, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा, स्वर-संगित शिक्षण, नाट्य व एकांकिका स्पर्धेत सहभाग…

★ स्वच्छ भारत अभियान → संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत प्रबोधन फलक, राष्ट्रपिता महात्मा गांधी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत शाळांना मोफत कचरापेटी वाटप, कचरा कुंडी असलेली ठिकाणे सुशोभिकरण करणे, मोफत कचरा संकलन पेटी सेवा, श्रीसाई पालखी रस्ता (कोपरगांव ते शिर्डी) लोक सहभागातून स्वच्छता अभियान सन २०१४ पासून…

★ वृक्षारोपन व पालकत्व → सूर्यतेज संस्था व संस्थेचे सदस्य महाराष्ट्र शासन वनविभागाचे ‘महाराष्ट्र हरितसेना’ सदस्य आहे. पर्यावरणास उपयुक्त रोपांची निवड करून सुमारे ७२ ठिकाणी वृक्षारोपन व पालकत्व अभियान सन २०१२ पासून….

★ विशेष सन्मान→
प्रथम पारितोषिक – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव २०१६ मध्ये सादर ‘शासन योजनांची साक्षरता’ देखावा…
द्वितीय व वैयक्तिक पारितोषिक – महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा-२००७, संस्थेच्या सदस्यांना एकांकिका, बालनाट्य स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिके, विविध सामाजिक उपक्रमांचे सन्मान…
|| उजळवू या अंधार सारा ||
#सूर्यतेज…
या पुढेही सूर्यतेज संस्थे मार्फत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहे.आपणही स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी होवून स्वेच्छेने सहकार्य करु शकतात…
वार्षिक उपक्रमांना स्वेच्छेने देणगी थेट खात्यात जमा करु शकतात…

Suryatej Sanstha,Kopargaon
A/C.No. : 066210110007721
IFSC Code : BKID0000662
Bank Of India,Kopargaon
संपर्क :- मो. 9423166103, 9422667792

|| उजळवू या अंधार सारा ||
#सूर्यतेज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *