सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व :- श्री सुमित कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग २०२६ चा जल्लोषात शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी:-व्यस्त जीवनशैलीतून माणसिक ताजेपणा मिळविण्यासाठी आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्यासाठी खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. खेळातुन सांघिक भावना वाढीस लागुन एकोपा निर्माण होतो. म्हणुन सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी काढले.
कोपरगांव तालुक्यातील शिक्षकांमध्ये क्रीडावृत्ती, उत्साह आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग २०२६ या क्रिकेट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच तालुका क्रीडा संकुल, टाकळी फाटा येथे, संजीवनी अकॅडमी परिसरात मोठ्या जल्लोशात पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात श्री सुमित कोल्हे उद्घाटक म्हणून बोलत होते. माजी सभापती श्री सुनील देवकर हे समवेत उपस्थित होते.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की शिक्षकांसारख्या समाजघटकांसाठी अशा स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून, त्या आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैली घडविणाऱ्या ठरतात.यावेळी त्यांनी संजीवनी परिवाराची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत, अशा उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे नेहमी पाठबळ असते.
स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी संजीवनी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल तसेच संपूर्ण संजीवनी शिक्षण संस्था सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या मैदानावर स्वतः स्व. कोल्हे उपस्थित राहून त्यांनी केलेल्या वृक्षारोपण व संगोपनाची आठवण सांगताना, आज या झाडांची सावली म्हणजे जणू त्यांचे आशीर्वादच असल्याची भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.
या सामन्यांमध्ये प्रथम, द्वीतिय, तृतिय व चतुर्थ विजेत्या संघास अनुक्रमे रू ७१०१,रू ५१०१, रू ३१०१ व रू २१०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. मालीका विरास रू ११०० चे बक्षिस आहे. तसेच सर्वाधिक चौकार, उत्कृष्ट गोलंदाज, उत्तम संघ, सर्वाधिक षटकार , उत्कृष्ट झेल, हॅटट्रीक, उत्कृष्ट यष्टीरक्षक , अष्टपैलु खेळाडू सामनावीर अशा वर्गवारीतील खेळाडूंना प्रत्येकी रू ५०० व ट्रॉफी बक्षिस देण्यात येणार आहे.
याप्रसंगी किरण निंबाळकर, मनोहर शिंदे, महेंद्र विधाते, रमेश दरेकर, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, मनोज सोनवणे, विद्या आढाव, सुनील पोरे, दिपक तुंगार, राहुल भागवत, विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, अमोल कडू, मारुती भोईर, सुधाकर निकुंभ, संजय साबळे, नारायण कवडे, गोविंद आढळ व मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

फोटो ओळीः कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग २०२६ या क्रिकेट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बोलताना श्री सुमित कोल्हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *