कोपरगाव प्रतिनिधी:-
“ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. गावी झालेला हा सत्कार मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. सामाजिक प्रश्नासाठी सातत्याने २२ वर्षे अंदोलने केली.शिवसेनेशी २२ वर्षे असलेली निष्ठा फळाला आली.बड्या शक्तीविरुध्द लढतांना मोठा त्रास झाला.पण जनतेने निवडणुक हातात घेतली होती.
निवडुन आलेल्या ठिकाणचे पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामे राबविण्यास मी कटिबद्ध आहे,” गावी सत्काराने जबाबदारीची जाणीव; काम करण्यास नवी प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वर्पे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रांजणगाव देशमुखचे भुमीपुत्र दत्तात्रय वर्पे यांची संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी पंचायत समिती गणातुन सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा मूळ गावी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. गावातील हनुमान मंदीरासमोर हा सत्कार आयोजीत करण्यात आला होता.त्यांनी शिवसेना(उबाठा) कडुन ही निवडणुक लढविली.
यावेळी ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्या तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात व फटाकाच्या अताषबाजीत स्वागत करत ग्रामस्थांनी विजयाचा जल्लोषही साजरा केला.
यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष वर्पे,सरपंच गजानन मते,उपसरपंच त्र्यंबक वर्पे,सोसायटीचे चेअरमन नवनाथ वर्पे, संदिप रणधिर,सचिन खालकर,कैलास रहाणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रंगनाथ गव्हाणे,धनंजय वर्पे,प्रभाकर वर्पे,ज्ञानदेव गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,अरुण वर्पे,आत्याभाऊ वर्पे,संजय वर्पे,तुकाराम गोर्डे,बाळासाहेब बिडवे,गोरख वर्पे,विरेंद्र वर्पे, भास्करराव वर्पे,राहुल वर्पे,सुनिल वर्पे,सोमनाथ वर्पे,सुरेश वर्पे,नानासाहेब वर्पे,अशोक खालकर,रामा वर्पे,नितीन वर्पे,किशोर शिंदे,अंबादास वर्पे,आण्णासाहेब वर्पे,प्रसाद गव्हाणे,स्नेहल गव्हाणे,विकास वर्पे, अनिल वर्पे, सिताराम वर्पे,आण्णासाहेब खालकर,कृष्णा सदाफळ ,सारीका सदाफळ,भुषण रणधिर,सुशांत ठोंबरे,साईल रणधिर,तुषार चव्हाण,शैलेश खालकर आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटोओळी:- रांजणगाव देशमुख ता कोपरगाव येथिल भुमीपुत्र दत्तात्रय वर्पे यांची संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी पंचायत समिती गणातुन सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा मूळ गावी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
