सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्यासभासद वारसास दोन लाख रुपये विमा धनादेश प्रदान…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील खिर्डीगणेश येथील सह‌कारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सभासद भाऊसाहेब शुक्लेश्वर दैने यांचे अपघाती निधन झाल्यांने त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुशिलाबाई दैने यांना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या दुरदर्शीपणाने कारखान्याने उतरविलेल्या पॉलीसीतुन दोन लाख रुपयांचा विमा धनादेश गुरुवारी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रारंभी संचालक श्री. ज्ञानेश्वर परजणे प्रास्तविक करताना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, बिपिनदादा कोल्हे यांनी सभासद शेतकरी, कामगारांसाठी न्यू इंडीया इंशुरन्स कंपनीकडून जनता अपघात विमा पॉलिसी घेतली होती. कारखान्याचे अध्यक्ष श्री विवेकभैय्या कोल्हे यांनी मयत सभासद कै. भाऊसाहेब शुक्लेश्वर दैने यांच्या वारसाकडून त्यांच्या अपघातासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पुर्तता करून न्यु इंडीया इंशुरन्स कंपनीकडे त्याचा विमा क्लेम दाखल केला. कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, उप मुख्य लेखाधिकारी प्रवीण टेमगर यांनी अपघात विमा प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून मोठा पाठपुरावा केला. न्यू इंडीया इन्शुरन्स कंपनीने दोन लाख रुपये विमा धनादेश मंजुर केला. सभासद कर्मचाऱ्यांच्या कठीण प्रसंगात विमा महत्वाचा आहे. दैने कुटुंबीयांच्या वारसांना या रकमेचा आधार मिळाला आहे.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, बाळासाहेब पानगव्हाणे आदि उपस्थीत होते. शेवटी संचालक निवृत्ती बनकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *