जिल्हा परिषद गटामध्ये कोविड सेंटर सुरू करावे:- नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड साथीच्या आजाराचा उद्रेक पहाता कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये देखील कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरात विद्यमान आमदार आशुतोष काळे व माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी सुसज्ज कोविड सेंटर उभारणी केली त्यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे
काळे कोल्हे हे कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करतात असे बोलले जाते मात्र कोपरगाव शहरात महापूर,व तालुक्यात दुष्काळ आदी आपत्ती असल्याने हेच नेते कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे तारणहार म्हणून पुढे येतात सुमारे तीस चाळीस वर्षांपासून तालुक्यातील जनतेने या दोन्ही कुटुंबावर दाखविलेला विश्वास व त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न कोविड महामारीत या दोन्ही कुटुंबातील तिसऱ्या पिढीने सार्थ ठरवला आहे निवडणुकी पुरतेच एकत्र येणारे नेते अशी चर्चा करणाऱ्या तालुक्यातील जनतेला सद्या कोणतीही निवडणूक नसताना या कुटुंबाने शहरात कोविड सेंटर उभे करून दिलासा दिला आहे.मात्र सद्या तरी ग्रामीण भागात साथीच्या आजाराने कहर मांडला आहे त्यामुळे ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे या रुग्णांना उपचारासाठी कोपरगाव शहरातील कोविड सेंटर मध्ये दाखल करावे लागते नुकतेच पोहेगाव येथे नितीनराव औताडे यांनी सुसज्ज कोविड सेंटरची उभारणी करून त्या भागातील जनतेला दिलासा दिला आहे ग्रामीण भागात जिल्हा परिषद गटात ग्रामीण आरोग्य उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व नर्स उपलब्ध आहेत मात्र या आरोग्य उपकेंद्रात जिल्हापरिषद गटामध्ये कोविड सेंटरची उभारणी केल्यास कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळेल त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील काळे कोल्हे यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद गटात कोविड सेंटर व विलगीकरन कक्ष सुरू करावे असे या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *