ज्ञानदीप विझला, पण प्रकाश अजूनही आहे.ॲड.संदिपजी वर्पे यांना पितृशोक….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कळविण्यात अत्यंत वेदना होत आहेत की
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार साहेब) पक्षाचे जिल्हाध्यक्ष
अ‍ॅड. संदीपभाऊ वर्पे यांचे वडील
के.जे. सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य
श्री. गोरक्षनाथ गयाजी वर्पे (सर)
यांचे दुःखद निधन झाले.
ही बातमी ऐकताच मन नकळत भूतकाळात हरवून गेले…
गुहा, ता. राहुरी येथील साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला,
पण विचारांनी विशाल असा हा अभ्यासू, शांत, आणि संवेदनशील शिक्षक
आज आपल्यातून निघून गेला.
राहुरी कॉलेजपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास
सोमय्या महाविद्यालयात येऊन आदर्श प्राध्यापक म्हणून फुलून आला.
अर्थशास्त्र हा विषय असूनही
अनेक विद्यार्थी फक्त सरांना ऐकण्यासाठी त्यांच्या तासाला हजर रहात.
संतांची विचारधारा, समाजाविषयीची संवेदना,
वक्तृत्वाची जादू आणि अध्यापनातील प्रामाणिकपणा….
यामुळे सर विद्यार्थ्यांच्या हृदयात घर करून राहिले.
सरांचा सहवास लाभलेले त्यांचे जिवलग सहकारी
प्रा. बाबुराव शिंदे, प्रा. ना. स. फरांदे, बालवे सर,
अनिल सोनार सर, घैसास सर आणि गुळगुळे सर अशोक रावजी रोहमारे अण्णा
हेही सरांबद्दल अपार आदर, आपुलकी आणि जिव्हाळा बाळगून होते.
या सगळ्यांची मैत्री म्हणजे ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची एक सुंदर वेल.
अनेक उपक्रम, विद्यार्थी संघटन, कॉलेजचे प्रत्येक पाऊल….
यात या सर्वांची एकजुट आणि सरांचे नेतृत्व नेहमी झळकत राहिले.
KJS
महाविद्यालयाच्या जडणघडणीच्या काळात
पी.जी . विभाग, सायन्स कॉलेज, विविध विषयांची वाढ…..
यामध्ये सरांचा मोलाचा वाटा होता.
सेवानिवृत्तीनंतरही राहाता येथे प्राचार्य म्हणून
त्यांनी शिक्षणसेवेची अखेरपर्यंत अखंड ज्योत जपली.
सरांची मूल्यांची शिदोरी त्यांच्या तिन्ही मुलांवर….
डॉ. नचिकेत , जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप , आणि इंजिनिअर समीर
जितक्या प्रेमाने, तितक्याच कठोरतेने त्यांनी रुजवली.
सौभाग्यवतीही रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका….
एक संपूर्ण शैक्षणिक कुटुंब!
आज असा अभ्यासू, वक्तृत्ववान , सामाजिक भान असणारा,
विद्यार्थ्यांचा जीव की प्राण असलेला देवदूतासारखा प्राचार्य हरपल्याचे दुःख
मनाला अक्षरशः पिळून टाकते.
चार वर्षे सोबत काम करताना
सरांनी दिलेल्या शिस्त, संस्कार, आणि माणुसकीच्या शिकवणी
आजही आयुष्याचा मार्ग उजळत आहेत.
आज मन भरून आलंय…
डोळ्यांत अश्रू दाटून येत आहेत…
कारण सर गेले असले, तरी
त्यांचा प्रकाश—ज्ञानाचा, संस्कारांचा, आणि माणुसकीचा….
कधीच मावळणार नाही.

वर्पे सरांना विनम्र श्रद्धांजली

गोरे सर
9850613612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *