जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने, संवत्सर गावांत “हरी ओम नाष्टा” सेंटर सुरु…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(संवत्सर): – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधात आर्थिक आधार व  दिव्यांग बांधवांना बद्दल समाजामध्ये चांगले आदराचे स्थान मिळावे या हेतूने कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील सौ अंजली प्रमोद गोसावी हिने  स्वतः च्या हिंमतीवर व जिद्दीने हरी ओम या नावाने नाष्टा सेंटर सुरु केल्याचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. यासाठी कोपरगाव तालुक्याचे भाजपा दिव्यांग सेल अध्यक्ष श्री मुकुंदमामा काळे व संवत्सर ग्रामपंचायत सदस्य, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महेश परजणे यांनी विशेष सहकार्य करुन  जागतिक दिव्यांग दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. 
कोपरगाव तालुक्याचे भाजपा दिव्यांग सेल अध्यक्ष श्री मुकुंदमामा काळे  बोलतांना म्हणाले की, जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली घेतलेला निर्णय अतिशय दिव्यांगाच्या प्रगतीसाठी भरारी देणारा असुन सर्व दिव्यांगाच्या वतीने मुख्यमंञी यांचे आभार मानात श्री काळे पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी असे काळे म्हणाले. 


याप्रसंगी महेश परजणे बोलतांना म्हणाले की, एका दिव्यांग भगिनेने सुरू केलेला व्यवसाय कौतुकास्पद असुन दिव्यांग बांधवाना प्रेरणा देणारा ठरणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये, ३ डिसेंबर  रोजी दिव्यांग दिन जगभरात साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला.तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक ‘दिव्यांग दिन’ म्हणून साजरा केला जातो.जागतिक दिव्यांग दिनाच्या  निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा,त्यांचे शिक्षण,प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी असे शेवटी श्री. परजणे म्हणाले.
यावेळी  मोहन निकम साहेब, दिनेश बोरनरे, शिवाजी फटांगरे, सोमनाथ दैने, अजीजभाई शेख, प्रमोद गोसावी, संकेत दिघे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *