कहाणी एका जिद्दीची उषाताई पवार यांच्या संघर्षाची :- गोरे सर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दारिद्र्याने झाकोळलेलं आयुष्य,
पण डोळ्यांत स्वप्नं होती उजेडाची…
कोपरगावच्या सुभाष नगरातून उठलेली ती मुलगी ,
आज महाराष्ट्राच्या सेवेत तेजाने उजळलेली!

आई ….. अहिल्याबाई , हातात झाडू पण मनात भगवंत ,
पतीचे छत्र हरवले तरी हृदयात माणुसकीचा अंत नाही कधीच…
भाऊ … ज्ञानेश्वर , संभाजी चौकात बूट पॉलिश करत,
बहिणीच्या भविष्याचे शूज चमकवणारा देवदूतच जणू!
आठ बाय दहा चं घर… पण
त्या घरात होती स्वप्नांची विश्वं, आकाशाएवढी!
उषाताई पवार नाव उच्चारलं की वाटतं,
मेहनत ” हाच तिचा धर्म, ” संघर्षहेच तिचं साधन !
आज त्या ‘ डीवायएसपी ’ झाल्या ….
म्हणजेच दारिद्र्यालाही दिला सलाम ठोकून नमस्कार!
त्यांच्या पदवीच्या मिरवणुकीत नाही दिखाऊपणा,
तर आहे आईच्या हातांचा सुगंध,
आणि भावाच्या घामाचा पवित्र ताज!

जशी श्री संत रोहिदास म्हणतात ….
मनुष्य चंद्रा-ताऱ्यांना गाठतो,
पण ज्याचं मन निर्मळ त्यालाच देव भेटतो!”
उषाताई , तुमचं मन निर्मळ, प्रयत्न अपार
तुमचं यश म्हणजे आमच्यासाठी दीपस्तंभ साकार!

कोपरगावचा प्रत्येक कोपरा आज अभिमानाने उजळला,
सुभाष नगर ” आज जिद्दीचं प्रतीक बनला!

मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन *उषाताई गंगाधर प
तुमच्या या यशाला साष्टांग नमस्कार

श्री व सौ गोरे सर
९८५० ६१३ ६१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *