एस. जी. विद्यालयाचा अभिमान “शिवप्रसाद घोडके” :- सुरेश गोरे सर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
एस. जी. विद्यालयाचा माजी विद्यार्थी शिवप्रसाद घोडके याने आपल्या परिश्रम, जिद्द आणि ध्येयनिष्ठेच्या जोरावर MPSC परीक्षा २०२३ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काल घोषित झालेल्या निकालानुसार त्यांची नाशिक तालुका क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
२००० साली एस. जी. विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुढे लोणी येथून बी.पी.एड. पूर्ण केले.
२००७ पासून महर्षी विद्यालयात क्रीडाशिक्षक म्हणून सेवा बजावत असलेल्या या तरुणाने आपला खेळ, शिस्त आणि कर्तृत्व यांचा सुंदर मेळ घालून आपल्या प्रवासाची नवी उंची गाठली आहे.
घराण्याचाच वारसा पुढे नेणारा हा तरुण …
आजोबा स्वातंत्र्यसैनिक ,
चुलते दिलीप घोडके सरशिक्षक तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, भाऊ सुशांत घोडके सामाजिक कार्यकर्ता,
आणि घरचं वातावरणच खेळाची शिदोरी देणारं…
मग शिवप्रसादचं यश म्हणजे त्या परंपरेला दिलेला सुवर्णमुकुटच !

घामाच्या थेंबांनी लिहिला विजयाचा इतिहास,
ध्येय होतं डोळ्यांत, विश्वास होता श्वासात खास…
परिश्रमाच्या पंखांनी गाठली आकाशाची उंची,
एस. जी.’ चा हा विद्यार्थी — आमचा अभिमान, आमची संपत्ती!”
शिवप्रसाद घोडके यांना मनःपूर्वक अभिनंदन!
त्यांच्या यशाने विद्यालयाचे नाव उजळले आहे.
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ….
अशीच जिद्द, असेच कार्य आणि असाच प्रेरणेचा प्रवाह अखंड राहो! अभिमान व कौतुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *