

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर दुतर्फी बसणाऱ्या छोटया मोठ्या स्टॉलधारकांचे मोठ्या प्रमाणावर पावतीद्वारे आर्थिक लुट होत आहे. सनासुदीच्या काळात छोटेमोटे व्यावसायीक शहरातील रस्त्याच्या दुतर्फी बसुन आपला व्यवसाय करतात. त्यातून फार मोठ्या नफयाची अपेक्षा नसते. तरीपण नगरपालिकेचे वसुली अधिकारी मनमानी पध्दतीने जास्त प्रमाणात पावती आकारून आक्षरशहा लुट करतात. तर काही ठिकाणी जास्त पैसे आकारून पावती देत नसल्याचा प्रकार घडतो आहे. सदर प्रश्नात लक्ष घालून शहरातील छोटया मोठ्या व्यावसायीक बंधुंची लुट थांबवावी यासाठी आण्णाभाऊ साठे माल वहातुक चालक-मालक असोसिएशन संस्थापक अध्यक्ष संदीप निरभवणे यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे पुढे निवेदनात म्हटले आहे की येत्या 8 ते 10 दिवसात लुट थांबली नाही तर कोपरगांव नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.यावेळी जतिन निरभवणे आकाश नाईकवाडे
तसेच युनियनचे सभासद उपस्थित होते.
