


कोपरगाव प्रतिनिधी:-
गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विविध दानशूर व्यक्तिंच्या मदतीने मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन जवळजवळ 85 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप करण्यात आले . श्रीमती बानुबाई धर्मदाय ट्रस्ट लौकी , अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ गोधेगाव , पिपल्स बँक कोपरगाव, भन्साळी ट्रस्ट कोपरगाव जगदिश गारमेंट्स कोपरगाव , श्री बोरणारे सर कोपरगाव , तसेच विद्यालयातील सर्व सेवकवृंद यांच्या मदतीने विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना गणवेश वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री बाबासाहेब पा खिलारी हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री माधवराव पा रांधवणे मा श्री प्रकाशराव पा शिंदे मा श्री अशोकराव पा भोकरे मा श्री अशोकराव पा पठाडे प्रा श्री किरण सोळसे प्रा श्री सूरज हुसळे श्री सागर सोळसे व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी जुंधारे यांनी सर्व दानशूर व्यक्तिचे आभार मानले व विद्यालयाच्या प्रगतीबाबत माहिती दिली . या वेळी विद्यालयातील श्री गायधने सर श्री रांधवणे सर आदी सहकारी शिक्षक उपस्थित होते.
