सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची परदेशात गरुडझेप,नवनाथ नरोटे नुकताच ओमन देशामध्ये रुजू…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- २००६ पासून महाराष्ट्र शासन मान्य कोपरगाव येथे बाळासाहेब सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सुरू असून आजपर्यंत संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी देश विदेशातील अनेक पंचतारांकित हॉटेल मध्ये गरुड झेप घेतली असून नुकताच संस्थेचा माजी विद्यार्थी नवनाथ माधव नरोटे हा ओमन या देशात नोकरीसाठी रुजू झाला असून या मुळे नक्कीच संस्थेचे नाव जगाच्या पाठीवर चमकले असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
दत्ताचे शिंगवे मनमाड येथील मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या नवनाथ माधव नरोटे यांने तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय मान्यता प्राप्त बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव मध्ये एक वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पूर्ण करत शिर्डी येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये ट्रेनिंग पुर्ण करत आयुष्यात एकदा तरी परदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगत नवनाथला घरातून कोणतेही मार्गदर्शन नसतांना स्वतःच्या हुशारीवर व मेहनतीवर परदेशात नोकरीला जाण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यात त्याला यश मिळाले असून तो आज ओमन या देशाची राजधानी असलेल्या मस्कत या शहरातील ओका-बोका या पंचतारांकित हॉटेल रेस्टॉरंट मध्ये कॉमी-द-शेफ या पदावर रुजू झाला असून मोल मजुरी करणाऱ्या दत्ताचे शिंगवे मनमाड येथील नवनाथ नरोटे च्या आई-वडिलांची व संपूर्ण कुटूंबाची मान अभिमानाने उंचावली आहे.
देश विदेशात शंभर टक्के नोकरीची हमी देणाऱ्या कोपरगाव येथील सातभाई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे याआधी देखील अभय वडनेरे, निरंजन वडनेरे, किरणकुमार धाकतोडे, ज्ञानेश्वर , अक्षय शेळके, दिलीप निरगुडे, देवेंद्र रजपूत हे विद्यार्थी मलेशिया, सिंगापूर, जपान, दुबई या देशात नोकरी करून आले आहे तर आज रोजी येसगाव येथील किरण बाजीराव दुशिंग हा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशात उच्च पदावर व पगारावर क्रूझ वर गेल्या तीन वर्षापासून नोकरी करत आहे. तसेच संस्थेतील अनेक विद्यार्थी राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये उच्च पदावर कार्यरत असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेला सार्थ अभिमान असुन संस्थेचे अनेक विद्यार्थी आज समाजात नावलौकिक मिळवत असून हीच खरी संस्थेची खरी कमाई आहे. या सर्व विद्यार्थ्यांना माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ऐश्वर्या सातभाई, संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापूसाहेब डांगे, प्रा विजय कापसे, प्रा विशाल धारणगावकर आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

फोटो ओळ-नवनाथ नरोटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *